विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे. वीस वर्षांच्या लढाईनंतर अफगाणिस्तानात मागे ठेवलेला गोंधळ निस्तरण्यासाठीच पाकिस्तानचा उपयोग असल्याचे अमेरिकेला वाटत. सामरिक भागीदारी करायची असेल तेव्हा अमेरिकेला भारत आठवतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.Imran Khan’s rift with US over India, says US misses India if it wants to forge strategic partnership
परदेशी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान म्हणाले, अफगाणिस्तानच्या समस्येवर लष्करी तोडगा नसतानाही तो शोधण्याच्या २० वर्षांच्या प्रयत्नांनंतर तेथे जो काही गोंधळ झाला, तो काहीही करून निस्तरण्याच्या बाबतीतच पाकिस्तान उपयोगी असल्याचे मानले जाते. अमेरिकेने भारतासोबत सामरिक भागीदारी करायचे ठरवल्यापासून तो देश पाकिस्तानला वेगळी वागणूक देत आहे.
बायडेन यांनी गेल्या जानेवारीत पदभार स्वीकारल्यापासून ते इम्रान खान यांच्याशी न बोलल्याबाबत पाकिस्तान नाराज आहे. अफगाणिस्तानसारख्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात पाकिस्तानला महत्त्वाचा देश मानूनही पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संपर्क साधण्याच्या बायडेन यांच्या अनिच्छेबद्दल पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती.
Imran Khan’s rift with US over India, says US misses India if it wants to forge strategic partnership
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये यंदा विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थी शिकणार
- मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांना अंधारात ठेऊन सिध्दू यांनी केल्या चार सल्लागारांच्या नियुक्त्या
- माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार
- आरोग्याच्या सुविधा वाढल्याने निवृत्तीचे वय वाढवा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस