वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकच्या इम्रान खान यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते. ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-कायद’चे(पीएमएल-क्यु) प्रमुख चौधरी परवेज इलाही यांनी हा दावा केला आहे. ते सरकाररमधील घटक पक्षाचे नेते आहेत. Imran Khan’s government will collapse? , Opponents’ no-confidence motion; Party MPs slap fines
ते म्हणाले, हे सरकार १०० टक्के संकटात आहे. ते वाचवणे अत्यंत कठीण बाब आहे. पंतप्रधानांनी स्वतः खासदारांची समजूत काढळी नाही, तर कदाचित येत्या काही दिवसांतच सरकार कोसळू शकते.
पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. स्थानिक माध्यमांनी इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षा’चे (PTI) जवळपास १८ ते २० खासदार बंडखोरी करुन स्वतःच्या सरकारविरोधात मतदान करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
इलाही काय म्हणाले?
चौधरी परवेज इलाही पाकच्या सर्वात मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत. ते पंजाब प्रांतातून येतात. त्यांच्या पक्षाचे ५ खासदार इम्रान सरकारला पाठिंबा देत आहेत. पंजाब प्रांतातही सध्या इम्रान यांच्या पक्षाचे सरकार असून, येथेही इलाही यांचे काही आमदार सरकारला पाठिंबा देत आहेत. माध्यमांनी इम्रान यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांचीही खूर्ची संकटात असल्याचा दावा केला आहे.