• Download App
    पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, अफगाणिस्तानातील स्थिती अमेरिकेने बिघडवल्याचा इम्रान यांचा आरोप|Imran Khan targets USA

    पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, अफगाणिस्तानातील स्थिती अमेरिकेने बिघडवल्याचा इम्रान यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – अमेरिकेने अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडवून ठेवली, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. अमेरिकेने अफगाणिस्तानातील प्रश्ना वर राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न फार आधीच करायला हवा होता.Imran Khan targets USA

    मात्र, आता त्यांनी अचानक बाहेर पडण्याची घोषणा केल्याने तालिबानला विजयी झाल्यासारखे वाटत आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणे अवघड आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

    इम्रान खान म्हणाले, ‘‘अफगाणिस्तानमधील समस्या लष्करी बळाचा वापर करून सोडविण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला. हा प्रयत्न कधी यशस्वी झालाच नसता. माझ्यासारख्या अनेक लोकांनी त्याला वारंवार विरोध केला. मात्र, मला अमेरिकाविरोधी म्हटले गेले, काहींनी तर तालिबान खान असेही मला नाव ठेवले.



    लष्करी बळाचा काहीही उपयोग होत नसल्याचे अमेरिकेला ज्यावेळी लक्षात आले, तोपर्यंत फार उशीर झाला होता, आपले म्हणणे मान्य करवून घेण्याची त्यांची क्षमता कमी झाली होती.

    अफगाणिस्तानमध्ये सर्वांचा समावेश असलेली राजकीय यंत्रणा निर्माण करणे आवश्यिक असून तालिबानही या यंत्रणेचा भाग असेल, असे इम्रान खान म्हणाले. अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडल्यास पाकिस्तानलाही स्थलांतरीतांचा मोठा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

    Imran Khan targets USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या