विशेष प्रतिनिधी
शिलाॅंग : आपण उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होऊ शकता. त्यामुळे आपण गप्प बसावे, असा सल्ला भाजपमधील काही मित्रांनी दिला होता,असा दावा मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. मलिक यांच्या दाव्यानुसार, ‘मी त्यांना सांगितले की मला या पदांची पर्वा नाही. पण मी त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो. ‘I don’t even care about the presidency in front of the farmers Satyapal Malik’s claim
मलिक रविवारी येथील कंडेला गावात कंडेला खाप आणि माजरा खाप यांच्या वतीने आयोजित किसान सन्मान सोहळ्याला संबोधित करत होते. शेतकरी आंदोलनासाठी केंद्र सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत मलिक यांनी सत्ता बदलण्यासाठी आणि शेतकर्यांचे सरकार स्थापन करण्यासाठी शेतकर्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
मलिक यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर निशाण साहिब फडकवणे औचित्यपूर्ण होते. त्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगितले. राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण स्वत: देशभर दौरे करून शेतकऱ्यांना एकत्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांशी दीडपट करार करून त्यांना आंदोलनावरुन उठवले. मात्र प्रकरण जैसे थे असल्याचे मलिक म्हणाले.
‘I don’t even care about the presidency in front of the farmers Satyapal Malik’s claim
महत्त्वाच्या बातम्या
- शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
- Nawab Malik : नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये जाताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा, नवाब भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है!!
- Good News : महापालिकेचा बेस्ट निर्णय!आता २४ तास ‘बेस्ट’सेवा
- फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक ; चप्पल फेकू नये, रोहित पवारांची “विनंती”; आता “अज्ञात” व्यक्तीविरुद्ध गुन्हा!!