विशेष प्रतिनिधी
ढाका – बांगलादेशात दुर्गा पूजन उत्सवादरम्यान अज्ञात समाजकंटकांनी मंदिरांची मोडतोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. विविध ठिकाणांवर झालेल्या हिंसाचारादरम्यान तीन जण मरण पावले असून अनेकजण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या घटनांनंतर २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत.Hindu temples targets in Bangladesh
एका स्थानिक वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार ईश्वआरनिंदेच्या आरोपांनंतर कुमिला भागातील मंदिर वादाचे केंद्र बनले होते. यानंतरच दोन गटांमध्ये हिंसाचार भडकला होता. स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत ही परिस्थिती नियंत्रणात आणली
चांदपूरमधील हाजीगंज, छत्तोग्राम येथील बंशखळी आणि कोक्स बाजारमधील पेकूआ येथे हिंदू मंदिरांची मोडतोड झाल्याचा आरोप होतो आहे.स्थानिक प्रशासनाने विनंती केल्यास राजधानीमध्येही निमलष्करी दले तैनात केली जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अष्टमीच्या दिवशी दुर्गा मूर्ती विसर्जनप्रसंगी अनेक पूजा मंडपांमध्ये मोडतोड करण्यात आली. हिंदूंना आता पूजा मंडपांचे संरक्षण करावे लागत असून सगळे जग यावर गप्प आहे, अशी खंत बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिलने व्यक्त केली आहे.
Hindu temples targets in Bangladesh
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले