वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात अद्यापही हिंदू कुटुंबांवर अत्याचार सुरूच आहेत. एका महिन्यात तीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आता एका हिंदू मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरणही समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तक्रार करूनही पाकिस्तान पोलिस आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवत नाहीत.Hindu girl gang-raped in Pakistan; Kidnapping from home 3 days ago, 7 people involved
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कोट गुलाम मोहम्मद मीरपूर खास येथे ही घटना घडली. जिथे कोहली समाजातील हिंदू मुलीला पंजाबी मुस्लिम तरुणांनी आपल्या वासनेची शिकार बनवले. बलात्कार करणाऱ्या तरुणांची संख्या 7 होती. ज्यापैकी पीडित तरुणी चौघांना ओळखते. सात तरुणांपैकी चार भुगरी, मेहबूब आणि दोन पंजाबी तरुण आहेत.
घरातून केले अपहरण
पीडित तरुणीने सांगितले की, आरोपी तरुणाने 30 सप्टेंबर रोजी तिचे घरातून अपहरण केले होते. यानंतर ते तिला सोबत घेऊन गेले आणि धमकी देऊन सात तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला.
घरी पोहोचल्यानंतर तिने घरच्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा एफआयआरही नोंदवला नाही.
Hindu girl gang-raped in Pakistan; Kidnapping from home 3 days ago, 7 people involved
महत्वाच्या बातम्या
- पक्ष सोडून उभा राहिलो, तर डिपॉझिटही जाईल; फडणवीसांचे वक्तव्य; पण इशारा कोणाला??
- महाराष्ट्रात भाजपच “बॉस” त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
- राजस्थानः वंदे भारत रुळावरून उतरवण्याचे षडयंत्र, रुळावर दिसले दगड आणि लोखंडी सळ्या
- सफाई कामगारांच्या वस्तीला मुख्यमंत्र्यांची भेट; गांधीजींना आदरांजली; कामगारांच्या घरी जाऊन चहापान!!