• Download App
    हॅरी पॅच, पहिल्या महायुद्धातील शेवटचा जिवंत सैनिक! त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय 111 वर्षे, 1 महिना, 1 आठवडा आणि 1 दिवस होते| Harry Patch, the last surviving World War I soldiers! He was 111 years, 1 month, 1 week and 1 day old when he died

    हॅरी पॅच, पहिल्या महायुद्धातील शेवटचे जिवंत सैनिक! त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय १११ वर्षे, १ महिना, १ आठवडा आणि १ दिवस होते

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : हॅरी पॅच हे पहिल्या विश्व युद्धातील एक सोल्जर होते. 25 जुलै 2009 रोजी त्यांचे निधन झाले होते. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा एक हजारच्या वर लोक त्यांचे फ्यूनरल अटेंड करायला आले होते.

    Harry Patch, the last surviving World War I soldiers! He was 111 years, 1 month, 1 week and 1 day old when he died

    ‘द लास्ट फायटिंग टॉमी’ हे त्यांना टोपणनाव मिळाले होते. पहिल्या विश्व युद्धातील एकमेव जिवंत राहिलेला लढाऊ योद्धा म्हणून त्यांना ओळखले जायचे. 1917 मध्ये पासचेनडेलची लढाई मध्ये ते जखमी झाले होते. त्यांना या महायुद्धात प्रचंड वाईट अनुभव आले होते. वेस्टर्न फ्रंटच्या खंदकात त्यांना काम करण्यास पाठवण्यात आले होते. आजवर त्यांनी आपले अनुभव कुठेही शेअर केले नव्हते. पण नंतर त्यांनी ‘द लास्ट फायटींग टॉमी’ या नावाने एक बेस्ट सेलिंग पुस्तक लिहुन पहिल्या विश्व युद्धातील त्यांचे अनुभव शेअर केले होते.


    भारतीय नौदलाला मिळाले पहिले P15B गाईडेड-क्षेपणास्त्र मारक, शत्रूला नामोहरम करण्याची ताकद


    आणि योगायोग असा की जेव्हा त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय 111 वर्ष,1 महिना,1आठवडा आणि 1 दिवस होते. ही अतिशय योगायोगाची गोष्ट म्हणावी लागेल.

    पहिल्या विश्व युद्धातील शेवटपर्यंत जिवंत राहिलेले साक्षीदार म्हणून बेल्जियममध्ये हॅरी पॅच मेमोरियल नावाचे एक स्मारक उभारण्यात आले आहे. जुलै 2018 मध्ये येथील एक फलक चोरीला गेला होता. ह्या फलकाच्या रिप्लेसमेंटसाठी क्राऊड फंडिंग करण्याचे ठरवले होते. आणि फक्त 5 तासांच्या अवधीतच 1500 युरोचे लक्ष गाठले होते.

    Harry Patch, the last surviving World War I soldiers! He was 111 years, 1 month, 1 week and 1 day old when he died

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सौदी अरेबिया-चीनचा पाकिस्तानवर दबाव, लष्कराला इम्रान यांच्याशी समेट करण्याची इच्छा, तुरुंगामध्ये मनधरणी सुरू

    अमेरिकेने युक्रेनला गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली; रशियात 300 किमीपर्यंत हल्ल्यास सक्षम

    भारताशी व्यापार सुरू करण्याची पाक व्यावसायिकांची मागणी; PM शाहबाज शरीफ यांच्यावर आणला दबाव