• Download App
    पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीशांच्या घरावर ग्रेनेड हल्ला!|Grenade attack on the house of former Chief Justice of Pakistan

    पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीशांच्या घरावर ग्रेनेड हल्ला!

    नवाझ शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणात केले होते अपात्र घोषित


    विशेष प्रतिनिधी

    लाहोर : पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांच्या लाहोरमधील निवासस्थानावर बुधवारी संध्याकाळी ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. निसार यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2017 मध्ये माजी पंतप्रधान नवाज यांना पनामा पेपर्स प्रकरणात अपात्र ठरवले होते.Grenade attack on the house of former Chief Justice of Pakistan



    “घरात शक्तिशाली स्फोट झाला तेव्हा मी आणि माझे कुटुंबीय ड्रॉईंग रूममध्ये बसलो होतो. मी गॅरेजमध्ये गेलो तेव्हा सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलिस जखमी अवस्थेत पडले होते. त्यांनी मला सांगितले की अज्ञात लोकांनी गॅरेजमध्ये ग्रेनेड फेकले आणि ते पळून गेले.” असे निसार यांनी एका खासगी टीव्ही चॅनलला फोनवरून सांगितले.

    जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आणि हा हल्ला आपल्यासाठी काही गंभीर संदेश घेऊन जात असावा, असा संशय आहे. असे त्यांनी सांगितले.

    पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला आणि पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत.” ते म्हणाले की, पोलिसांनी माजी सरन्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

    Grenade attack on the house of former Chief Justice of Pakistan

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार