कोरोनाच्या काळात भारताकडून मिळालेल्या मदतीबद्दल अमेरिकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोविड-19 च्या सुरुवातीच्या काळात भारताने अमेरिकेला ज्या प्रकारे पाठिंबा दर्शवला होता ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्हाला आता त्याच प्रकारे भारताला मदत करायची आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.Gratitude from the US for the assistance received from India during the Corona period, a promise to help India in the same way
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोनाच्या काळात भारताकडून मिळालेल्या मदतीबद्दल अमेरिकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोविड-19 च्या सुरुवातीच्या काळात भारताने अमेरिकेला ज्या प्रकारे पाठिंबा दर्शवला होता ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
आम्हाला आता त्याच प्रकारे भारताला मदत करायची आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.अमेरिकेच्या दौºयावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्लिंकन म्हणाले की,
सध्याच्या काळातील अनेक महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत आहेत. कोविड -19 चा सामना करण्यासाठी आपणही एकजूट आहोत. दोन्ही देशांची भागीदारी मजबूत आहे आणि आम्हाला असे वाटते की त्याचे चांगले निकाल मिळत आहेत.
जयशंकर यांनीही कोरोना लढ्याच्या कठीण परिस्थितीत अमेरिकेकडून मिळालेली मदत आणि एकतेसाठी जो बायडेन प्रशासनाचे आभार मानले आहेत. जयशंकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, दोन्ही देशांमध्ये चचेर्चे अनेक मुद्दे आहेत.
गेल्या वर्षी आपले नाते मजबूत झाले आहेत आणि पुढेही असेच राहण्याचा विश्वास आहे.जयशंकर यांनी म्हटले आहे की, ब्लिंकेनसोबतच्या भेटीमध्ये कोरोना लसीवर झालेली चर्चा सर्वात महत्त्वाची राहिली. आम्ही अमेरिकेच्या मदतीने भारतात लसीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.
या बैठकीमध्ये इंडो पॅसिफिक, क्वाड, अफगानिस्तान, म्यानमार यावर चर्चा झाली. त्याचबरोबर लसीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत-अमेरिका लस भागीदारीवर भर देण्यात आला.
Gratitude from the US for the assistance received from India during the Corona period, a promise to help India in the same way
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना काळात कैद्यांची गर्दी होणार कमी, राज्यात कारागृहांमधील ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल
- पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी