• Download App
    समस्त मानवजातीसाठी रेड अलर्ट, तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?|Global warming increased , red alert for humankind on earth

    समस्त मानवजातीसाठी रेड अलर्ट, तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?

     

    बर्लिन – पॅरिस पर्यावरण परिषदेत जागतिक नेत्यांनी तापमानवाढ रोखण्यासाठीची निश्चिधत केलेली दीड अंशांची कमाल मर्यादा येत्या दशकभरातच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.पृथ्वीवरील तापमानमान वाढीचा एकूण वेग पाहता पर्यावरण बदलाबाबतच्या समितीने (आयपीसीसी) आपल्या अहवालात याबाबत जाणीव करून दिली आहे. हा अहवाल म्हणजे मनुष्यासाठी ‘रेड अलर्ट’ असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.Global warming increased , red alert for humankind on earth

    पर्यावरण बदलाचा धोका कमी करण्यासाठी औद्योगिकीकरणपूर्व काळातील सरासरी जागतिक तापमानाच्या तुलनेत सध्याचे तापमान दोन अंशांपेक्षा अधिक वाढता कामा नये, असा शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता. २०१५ ला झालेल्या पॅरीस पर्यावरण परिषदेत सर्व जागतिक नेत्यांनी एकत्र येत ही तापमानवाढ दीड अंशांपेक्षा अधिक जाऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, ही मर्यादा आता येत्या काही वर्षांतच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.



    ‘आयपीसीसी’चा हा तीन हजार पानी अहवाल जगभरातील २३४ शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. पर्यावरण बदलाचा वेग स्पष्ट करण्यासाठी अहवालात एक उदाहरण देण्यात आले आहे. पूर्वी ५० वर्षांतून एकदा येणारी उष्णतेची लाट आता दर दहा वर्षांनी येत आहे. तापमान आणखी एक अंशाने वाढल्यास अशा लाटा दर दोन वर्षांनी येऊ शकतात.

    Global warming increased , red alert for humankind on earth

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Tabriz Missile : अमेरिकेचा इराणवर सलग 9 व्या रात्री हल्ला; ‘ताब्रिज’ क्षेपणास्त्र संकुलाला लागली आग, इराकमध्ये अमेरिकन सैनिकाचा मृत्यू

    Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते

    Pakistan Plans : गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान; विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी