नाशिक : रशिया – युक्रेन आणि भारत – पाकिस्तान यांच्यातले विरेनात युद्धाचे ढग; तरीही उतावळ्याच्या गळ्यात नोबेलचे पदक!!, असला प्रकार समोर आला. आपण जगातली सात युद्धे थांबवली, असा दावा करणाऱ्या उतावळ्याच्या गळ्यात अखेर नोबेल शांतता पदक घातले गेले, पण ते खरे नसून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) घालून दिले. त्यामुळे कोट्यावधी लोकांनी सोशल मीडियावर उतावळ्याची जोरदार खिल्ली उडवली. Donald Trump
इजराइल आणि हमास यांच्यातल्या युद्धात अमेरिकेने तोडगा काढला. तो दोन्ही बाजूंना मान्य झाला. त्यामुळे ओलीस धरलेले कैदी सुटायचा मार्ग मोकळा झाला. इजराइल आणि हमास यांच्यातले युद्ध सध्या तरी थांबले. याचा विजय उत्सव अमेरिकेत उतावळ्याने आणि इजराइल मध्ये पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी साजरा केला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गंमत
पण विजय उत्सव साजरा करताना बेंजामिन नेत्यान्याहू यांनी चक्क एकद गंमत केली. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मधून एक फोटो तयार करून तो सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. त्याच्यात स्वतः बेंजामिन नेत्यान्याहू हे उतावळ्याच्या गळ्यात शांततेचे नोबेल पदक घालताना दिसले मुख्य म्हणजे इजरायली पंतप्रधान कार्यालयाने तो फोटो x हँडल वर शेअर केला. त्यामुळे त्याची अधिकृतता वाढली. पण त्यामुळेच जगभरातल्या कोट्यावधी लोकांना उतावळ्याची टिंगल टवाळी करण्याची संधी मिळाली. अनेकांनी हास्यस्फोटक फोटो शेअर करून उतावळ्याची टिंगल केली.
– ओबामाला मिळते, मग उतावळ्याला का नाही??
बराक ओबामा यांना काही न करता नोबेल मिळून गेले आणि आपण जगभरातली 7 युद्ध थांबविली, तरी आपला विचार शांततेच्या नोबेल साठी झाला नाही, म्हणून उतावळ्याने भरपूर आगपाखड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी आपली शिफारस शांतता नोबेल पुरस्कारासाठी करावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. पण मोदी बधले नाहीत. उतावळ्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविले, असे मोदींनी मान्य केले नाही. त्यामुळे उतावळ्याची नोबेल मिळवायची इच्छा अजून तरी अपूर्ण राहिली.
पण इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने उतावळ्याची नोबेल पदक मिळवायची इच्छा पूर्ण करून टाकली. त्यांनी स्वहस्ते शांततेचे नोबेल पदक उतावळ्याच्या गळ्यात घातले. ते खरे शांततेच्या नोबेलचे दावेदार आहेत, असे इजरायली पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले. त्यामुळे उतावळे आणि त्यांचे समर्थक खुश झाले. प्रत्यक्षात नोबेल पुरस्कार जाहीर व्हायच्या आधीच उठावळ्याच्या समर्थक मंत्र्यांनी उताळ्याला the peace president असा किताब जाहीर करून टाकला. त्यामुळे सुद्धा उतावळा खुश झाला.
– मोदींशी चर्चा
याच दरम्यान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इजरायली कॅबिनेटची बैठक मध्येच सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली त्यांना इजराइल आणि हमास यांच्यातल्या शांतता कराराची माहिती दिली. पण त्यावेळी दोन्ही नेत्यांनी नोबेल शांतता पुरस्कार असे शब्दही उच्चारले नाहीत. म्हणजे निदान दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यालयांनी तसे जाहीर तरी केले नाही. त्यामुळे उतावळ्याच्या गळ्यात घातलेले नोबेल पदक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरतीच मर्यादित राहिले.
Give DonaldTrump the Nobel Peace Prize – he deserves it!
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!
- Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते
- डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!