विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अमेरिकेचे अभिनेते ॲलेक बाल्डविन (वय ६८) यांच्याकडून ‘रस्ट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चुकून गोळी झाडली गेल्याने सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू झाला. हलिना हचिन्स (वय ४२) असे मृत सिनेमॅटोग्राफरचे नाव आहे. या गोळीबारात दिग्दर्शक जोएल सुजा (वय ४८) देखील जखमी झाले आहेत.Film hero shots bullet on set, one dead
न्यू मेक्सिकोतील सांता फे सेटवर ‘रस्ट’ची शूटिंग सुरू असताना हा प्रकार घडला. शूटिंगदरम्यान ॲलेक बाल्डविन यांनी चित्रपटासाठी वापरण्यात येणाऱ्या पिस्तुलातून गोळी झाडली असता ती हलिना हचिन्स यांना लागली. गंभीर जखमी झालेल्या हचिन्सला हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.
परंतु रुग्णालयात पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तसेच अन्य जखमी दिग्दर्शक जोएल सूजा यांना ख्रिस्तियस सेंट व्हिन्सेंट रिजनल मेडिकल सेंटर येथे रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.या घटनेत वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची तपासणी केली जात आहे.
या घटनेनंतर बाल्डविन हे शेरिफच्या कार्यालयात पोचले आणि तेथे त्यांना अश्रू अनावर झाले. या प्रकाराबद्दल त्यांनी अद्याप मत व्यक्त केलेले नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे नायक ॲलेक बाल्डविन यांनी सरावासाठी पिस्तूल काढली होती. त्यात काडतूस भरलेले असल्याचे त्यांना माहीत नव्हते.
Film hero shots bullet on set, one dead
महत्त्वाच्या बातम्या
- सैतानाचा अवतार समजून महिलेला नग्न पूजा करायला भाग पाडून बळी देण्याचा प्रयत्न
- हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने पंतप्रधानांचा राजीनामा, माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप
- समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, किरीट सोमय्या यांचा नबाब मलिक यांना इशारा
- योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन घुसला एक जण, चार पोलीस निलंबित
- पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कब्जा करून गरीबी आणि गुलामीत ढकलले, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा आरोप