• Download App
    चायना व्हायरस म्हटल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुध्द खटला दाखल Filed a lawsuit against Donald Trump for calling it a China virus

    चायना व्हायरस म्हटल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुध्द खटला दाखल

    चीननेच कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरविला याबद्दल खात्री असल्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड चायना व्हायरस याचा उल्लेख करत होते. मात्र, आता यावरून चायनीज-अमेरिकन सिव्हील राईटस ग्रुपने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. Filed a lawsuit against Donald Trump for calling it a China virus


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : चीननेच कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरविला याबद्दल खात्री असल्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड चायना व्हायरस याचा उल्लेख करत होते. मात्र, आता यावरून चायनीज-अमेरिकन सिव्हील राईटस ग्रुपने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे.

    न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात खटला दाखल करण्यात आला. डोनाल्ड ट्रंप यांनी चायनीज व्हायरस आणि त्यासारखीच अनेक वंशद्वेषी वक्तव्ये केली आहेत. कोरोना व्हायरसचा उगम चीनमधून झाला आहे याबाबत आत्तापर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळलेला नाही. परंतु, डोनाल्ड ट्रंप यांनी संपूर्ण समाजाला बदनाम केले आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी संपूर्ण महामारीच्या काळात बेताल आणि बेजबाबदार वक्तव्ये केली. चीनी व्हायरसारख्या त्यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील चीनी समुदायाला भावनिक धक्का बसला आहे.



    कोरोनाच्या महामारीच्या काळात अशियन अमेरिकनांविरुध्द हिंसाचारही झाला. त्यामध्ये प्रामुख्याने चीनी समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यामागे डोनाल्ड ट्रंप यांची बेजबाबदार वक्तव्येच होती. यामधील एक भीषण प्रकार अटलांटा येथील एका मसाज पार्लरमध्ये घडला होता. १७ मार्च रोजी एका बंदुकधाऱ्या ने सहा महिलांसह आठ जणांना ठार मारले होते. सर्व जण अशियन होते.

    Filed a lawsuit against Donald Trump for calling it a China virus

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतात ₹1.6 लाख कोटींची गुंतवणूक करणार; AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणार

    Actor Dileep : मल्याळम अभिनेता दिलीपची रेप केसमधून मुक्तता; केरळ न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले; 2017 मध्ये चालत्या कारमध्ये गँगरेप

    UK PM Starmer : ब्रिटिश पीएम स्टार्मर म्हणाले- युक्रेनचे निर्णय तेच घेतील; झेलेन्स्कींना म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत; लंडनमध्ये युरोपीय नेत्यांची गुप्त बैठक