• Download App
    Facebook च नाव बदलले , मध्यरात्री झुकेनबर्ग ने केली ' ही ' घोषणाFacebook changed its name, Zuckenberg announced at midnight

    Facebook च नाव बदलले , मध्यरात्री झुकेनबर्ग ने केली ‘ ही ‘ घोषणा

    सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक च्या होल्डिंग कंपनीचं नाव बदललं आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ या नावाने ओळखली जाईल. Facebook changed its name, Zuckenberg announced at midnight


    विशेष प्रतिनिधी

    वाशिंगटन : गेल्या काही दिवसांपासून फेसबुक री-ब्रांडिंग करणार असल्याचं वृत्त समोर येत होतं. याला अनुसरून आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्गने यांनी गुरुवारी फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात याची घोषणा केली.भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही घोषणा करण्यात आली.येथे त्यांनी मेटावर्ससाठी असलेलं आपलं व्हिजन सांगितलंजुकरबर्गने सांगितलं की, आमच्यावर एक डिजिटल जग आहे.ज्यात वर्च्युअल रिएलिटी हेडसेट आणि एआयीमध्ये सामील आहे.

    सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक च्या होल्डिंग कंपनीचं नाव बदललं आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ या नावाने ओळखली जाईल.आम्हाला खात्री आहे की, मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल. नवी होल्डिंग कंपनी मेटा फेसबुक, याची सर्वात मोठी सहाय्यक कंपनी, सोबतच इंस्टाग्राम, व्हाट्सअॅप आणि वर्च्युअल रियलिटी ब्रँड ओकुलस सारख्या अॅप्सही समावेश करतील.

    फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये २०२१ साली १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी केलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने घोषणा केली होती.त्याचा वर्च्युअल रियलिटी सेगमेंट इतका मोठा होता की, आता आपले उत्पादन दोन श्रेणीत विभाजित करू शकतो, अशीही माहिती समोर आली.

    नाव बदलल्यासह कंपनीत रोजगारदेखील वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने घोषणा केली होती की, मेटावर्ससाठी त्यांना हजारो लोकांची गरज आहे. सध्या कंपनी १० हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे. हे ही तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा युजर्सवर काय होणार परिणाम.

    फेसबुकच्या या घोषणेमुळे ओरिजनल अॅप आणि सर्विस जी सुरू आहेत, ती सुरू राहतील आणि यात काही बदल होणार नाही. या कंपनीची री-ब्रँडिंग आहे आणि कंपनीचे बाकी प्रॉडक्ससारखे व्हॉट्सअॅप आणि इन्स्टांग्रामला कंपनीच्या नव्या लेबलअंतर्गत आणण्याची योजना आहे.

    Facebook changed its name, Zuckenberg announced at midnight

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही