विशेष प्रतिनिधी
बालाघाट : Balaghat मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या पचामा डोंगराळ परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांना ठार मारले असून, त्यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ही कारवाई बिठली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागात करण्यात आली.Balaghat
या कारवाईनंतर घटनास्थळी एक हँड ग्रेनेड, रॉकेट लाँचर, ३१५ रायफल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती विशेष नक्षल महासंचालक पंकज श्रीवास्तव यांनी दिली आहे.
श्रीवास्तव सांगितले की, “चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून, काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.”
मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली असून, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. आजच्या कारवाईत ३ महिला आणि १ पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी ही कामगिरी करणाऱ्या सुरक्षा दलांचे कौतुक करत त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील कुकानार भागात झालेल्या चकमकीतही सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. तेथून देखील स्वयंचलित शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती, अशी माहिती सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली होती.
Encounter in the mountainous areas of Balaghat, four Naxalites killed, including three women Naxalites
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister Sarma : …अन् संतप्त मुख्यमंत्री सरमांनी दिले दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश!
- Vijay Rupani : विजय रुपाणी यांचा लकी नंबर १२०६चा त्यांच्या मृत्यूशी कसा आला संबंध?
- That last selfie : विमानातला तो शेवटचा सेल्फी! डॉक्टर दाम्पत्य तीन मुलांसह सुरू करणार होते नवीन आयुष्य, पण…
- MP Chandrashekhar Azad : ‘..तर मीही अपघाताचा बळी ठरलो असतो’ ; चंद्रशेखर आझाद यांनी ‘सीट 11A’ उल्लेख करत केलं विधान