• Download App
    इलॉन मस्क बदलणार ट्विटरची ओळख, आता 'ब्लू बर्ड' ऐवजी ‘हा’ असेल नवा लोगो! Elon Musk will change the identity of Twitter now the new logo will be instead of Blue Bird

    इलॉन मस्क बदलणार ट्विटरची ओळख, आता ‘ब्लू बर्ड’ ऐवजी ‘हा’ असेल नवा लोगो!

    जाणून घ्या ट्वीट करत मस्क यांनी नेमके काय सांगिbतले?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  इलॉन मस्कने गेल्या वर्षी ट्विटरचे अधिग्रहण केले होते, तेव्हापासून इलॉन मस्क हे प्रसिद्ध ट्विटर लोगो बदलतील अशी शक्यता निर्माण झाली होती. मस्क यांनीही अनेकवेळा याचे संकेत दिले होते. आता मस्क यांनी स्वतः ट्विटरचा लोगो म्हणजेच ‘ब्लू बर्ड’ हटवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे. ट्विटरचा लोगो बदलण्याचा विचार करत असल्याचे मस्क यांनी ट्विट केले आहे. Elon Musk will change the identity of Twitter now the new logo will be instead of Blue Bird

    मस्कने ट्विटद्वारे सांगितले आहे की ते लवकरच ट्विटर ब्रँड आणि हळूहळू सर्व ब्लू बर्ड्सना निरोप देतील. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क एकापाठोपाठ एक नवीन बदल करत आहेत.याआधी इलॉन मस्क यांनी आणखी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी X लोगो ट्विटरच्या बर्ड लोगोची जागा घेणार असल्याचे सांगितले होते.

    एका ट्विटमध्ये, मस्क म्हणाले होते की, “आज रात्री एक छान X लोगो पोस्ट केला गेला, तर आम्ही त्याला उद्या तो जगभरात लाइव्ह करू.”  यासोबतच, आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी एक छोटा व्हिडिओ रिट्विट केला आहे, ज्यामध्ये ट्विटर बर्ड बंदचालू प्रकाशासह ट्विटरच्या बर्ड लोगोमध्ये रूपांतरित होत आहे.

    इलॉन मस्कच्या अनेक कंपन्यांचे नाव X ने सुरू होते. X लोगो देखील मस्कच्या नवीन आर्टिफिशल कंपनी xAI चा आहे, जो त्यांनी काही दिवसांपूर्वी लॉन्च केला होता. याशिवाय मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन कंपनीचे नावही स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X ने ट्विटर बर्ड लोगो बदलण्याची तयारी करत आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की लोगो असा असेल पण त्यात X असेल.

    Elon Musk will change the identity of Twitter now the new logo will be instead of Blue Bird

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन