• Download App
    जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलन मस्कची तिसऱ्या स्थानावर घसरण, फ्रेंच उद्योगपतीने मागे टाकले । Elon Musk Loses 2nd-Richest Ranking To Louis Vuitton's Bernard Arnault

    जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क यांची तिसऱ्या स्थानावर घसरण, फ्रेंच उद्योगपतीने टाकले मागे

    Elon Musk : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील अव्वल श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मस्क तिसर्‍या स्थानावर आहेत. फ्रेंच उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तूंची कंपनी लुईस व्हिटाँचे सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट यांनी त्यांना मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. तथापि, अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. Elon Musk Loses 2nd-Richest Ranking To Louis Vuitton’s Bernard Arnault


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील अव्वल श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मस्क तिसर्‍या स्थानावर आहेत. फ्रेंच उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तूंच्या कंपनीचे (LVMH Moet Hennessy)सीईओ बर्नाड अर्नाल्ट यांनी त्यांना मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. तथापि, अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

    टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

    सोमवारी टेस्लाचे शेअर्स 2.19 टक्क्यांनी घसरले आणि त्यामुळे मस्क यांच्या एकूण संपत्तीत एका दिवसात 3.16 अब्ज डॉलर्सची घसरण दिसून आली. 2021 मध्ये आतापर्यंत त्यांची संपत्ती 9.09 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. 161 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह एलन मस्क जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे यावर्षी बर्नार्ड अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती 46.8 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. 161.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. यावर्षी एलन मस्क यांच्या कंपनीला मोठ्या नुकसानीचाही सामना करावा लागला. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली.

    एलन मस्क यांचे व्यावसायिक अंतराळ सफरीचे स्वप्न

    एलन मस्क यांना प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचे आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, या जगाशिवाय दुसरे जगही तयार केले पाहिजे. आविष्काराच्या जोरावर व्यावसायिक अंतराळ उद्योगातील सर्वात मोठी कंपनी बनणे आणि लोकांना अंतराळाचा फेरफटका मारायला लावणे हे त्यांचे स्वप्न आहे. स्पेस एक्सने 3 अंतराळयान आधीच तयार केले आहेत. त्या कंपनीत पाच हजार कर्मचारी काम करत असून अंतराळातील नवनवीन शक्यता धुंडाळत आहेत.

    जागतिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस, दुसऱ्या क्रमांकवर एलव्हीएमएचचे सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट, तिसऱ्या क्रमांकावर एलन मस्क, चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आणि पाचव्या क्रमांकावर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आहेत.

    Elon Musk Loses 2nd-Richest Ranking To Louis Vuitton’s Bernard Arnault

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती