• Download App
    इलॉन मस्क यांचा नवा प्रोग्राम जाहीर : वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्याचे रूपांतर रॉकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये | Elon Musk launches new program: Atmospheric carbon dioxide absorption for the production of rocket fuel

    इलॉन मस्क यांचा नवा प्रोग्राम जाहीर : वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्याचे रूपांतर रॉकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांना नुकताच टाइम्स मॅगझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ हा सन्मान दिला आहे. इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनीमधून त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत येण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी आज एक ट्विट करून माहिती दिली आहे की त्यांच्या स्पेसएक्स या कंपनीद्वारे एक नवा प्रोग्राम हाती घेतला जात आहे.

    Elon Musk launches new program: Atmospheric carbon dioxide absorption for the production of rocket fuel

    या प्रोग्राम अंतर्गत वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेऊन त्याचा उपयोग रॉकेटसाठी इंधन बनवण्यासाठी करण्यात यावा यावर संशोधन केले जाणार आहे. लवकरच हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येईल यावर भर दिला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. सर्वात उत्तम कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारे डिव्हाइस बनवणाऱ्यास 100 दशलक्ष डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे.


    टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क म्हणतात, मी माझे सीईओ पद सोडून, इन्फल्यूएन्सर बनण्याचा विचार करत आहे


    वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून, हवेतील तापमानामध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना मानव जातीला सामोरे जावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर इलॉन मस्क यांनी जाहीर केलेला हा प्रोग्राम निश्चितच उपयोगी ठरेल.

    2026 पर्यंत त्यांनी आपले मिशन मंगळ पूर्ण करण्याचे ठरवले आहे. स्पेसएक्स द्वारे आता नासासाठी लॉन्चिंग सव्र्हिसेस देखील दिल्या जातात. लवकरच मनुष्यांना मंगळावर जाणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांनी 2026 पर्यंत मिशन कम्प्लिट करण्याचे ठरवले आहे.

    Elon Musk launches new program: Atmospheric carbon dioxide absorption for the production of rocket fuel

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या