विशेष प्रतिनिधी
दिल्ली : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. आपल्या अनोख्या आणि वेगवेगळ्या ट्विट्समुळे पण ते बरेच चर्चेत असतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ते आहेत. नुकताच त्यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी माझे सीईओ पद सोडून, इन्फल्यूएन्सर बनण्याचा विचार करत आहे. त्यांच्या ह्या ट्विट नंतर बऱ्याच प्रतिक्रिया ट्विटरवर शेअर केल्या जात आहेत.
Elon Musk, CEO of Tesla, says: “I am thinking of leaving my CEO position to become an influencer
पुढील जवळपास सात वर्षांसाठीचे टेस्ला कंपनीचे सीईओ म्हणून मस्क काम करणार आहेत. सततच्या कामाच्या दगदगीमुळे स्वत:ला वेळ न देता येणे ही सर्व जगाचीच खंत आहे. आणि हीच खंत मस्क यांची देखील आहे. आठवड्यातील सातही दिवस आपण दिवसरात्र काम करत असतो आणि स्वत:साठी अधिक थोडावेळ मिळाले तर चांगले होईल. अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मागे त्यांनी ट्विटरवर एक पोल घेतला होता. ज्यामध्ये त्यांनी लोकांचे मत मागितले होते. माझे 10 टक्के स्टोक्स विकावेत का? यावर जास्तीत जास्त लोकांनी हो असे मत दिले होते. त्यानंतर त्यांनी ते स्टोक्स विकले देखील होते. आता इलॉन मस्क चर्चेत आहे ते त्यांच्या या नव्या ट्विटमुळे.
Elon Musk, CEO of Tesla, says: “I am thinking of leaving my CEO position to become an influencer
महत्त्वाच्या बातम्या
- विधानपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी?; बावनकुळे – देशमुख, बजोरिया – खंडेलवाल आमने – सामने!!
- पांढर्या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी; उत्पादन कमी, दरवाढीने शेतकरी मालामाल
- आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी;कोरोना, ओमायक्रोन पार्श्वभूमीवर निर्णय
- पहिलीचे चार विषय आत एकाच पुस्तकमध्ये ; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं होणार कमी
- पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले