• Download App
    गुगल मॅपवर भरोसा नको रे बाबा, त्त्याचे लागले असते दुसऱ्याच मुलीशी लग्न | Don't rely on Google Maps, man nearly marries wrong woman

    गुगल मॅपवर भरोसा नको रे बाबा, त्याचे लागले असते दुसऱ्याच मुलीशी लग्न

    तंत्रज्ञानाच्या वापराने माणसाचे जीवन सुकर केले असले तरी कधी कधी त्याचा फटकाही बसू शकतो. इंडोनेशियातील एका नवरदेवाला असाच फटका बसला असता पण थोडक्यात हुकला. गुगल मॅपने चुकीचा पत्ता दाखविल्याने हे नवरोबा दुसऱ्याच विवाह समारंभात पोहोचले आणि तेथील नवरदेव आलेला नसल्याने यालाच लोक वर समजले. अगदी शेवटच्या क्षणी सगळी चूक लक्षात आल्याने दुसऱ्या मुलीशी लागणारे लग्न टळले. Don’t rely on Google Maps, man nearly marries wrong woman


    विशेष प्रतिनिधी

    जाकार्ता : तंत्रज्ञानाच्या वापराने माणसाचे जीवन सुकर केले असले तरी कधी कधी त्याचा फटकाही बसू शकतो. इंडोनेशियातील एका नवरदेवाला असाच फटका बसला असता पण थोडक्यात हुकला. गुगल मॅपने चुकीचा पत्ता दाखविल्याने हे नवरोबा दुसऱ्याच विवाह समारंभात पोहोचले आणि तेथील नवरदेव आलेला नसल्याने यालाच लोक वर समजले. अगदी शेवटच्या क्षणी सगळी चूक लक्षात आल्याने दुसऱ्या मुलीशी लागणारे लग्न टळले.

    जाकार्तातील ट्रिब्युन टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका गावात लग्न आणि साखरपुडा असे दोन वेगवेगळे कार्यक्रम होते. साखरपुडा असलेल्या कोम्पास या नवरदेवाचे  वरहाड़ नियोजित ठिकाणी जाण्यासाठी निघाले. त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला होता.



    मात्र, मॅपने त्यांना भलत्याच ठिकाणी नेले. याठिकाणी मारिआ आणि बुºहान सिद्दीकी यांचा विवाह होणार होता. या लग्नातील वऱ्हाड्यांना वाटले आपलेच पाहुणे आले आहेत. त्यामुळे त्यांची सरबराई सुरू करण्यात आली. त्यांना जेवणही देण्यात आले. त्यानंतर लग्नाचा समारंभ होणार होता. वधुचा मेकअप सुरू असल्याने त्याला काही वेळ लागला. मात्र, दरम्यानच्या काळात वऱ्हाड्यांच्या गप्पा सुरू झाल्यावर समजले की चुकीचे वऱ्हाड आहे. त्यामुळे विवाह समारंभ टळला. या सगळ्या गोंधळामुळे वऱ्हाड्यांची चांगलीच फजिती झाली.

    Don’t rely on Google Maps, man nearly marries wrong woman

    वाचा…

    Related posts

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!