तंत्रज्ञानाच्या वापराने माणसाचे जीवन सुकर केले असले तरी कधी कधी त्याचा फटकाही बसू शकतो. इंडोनेशियातील एका नवरदेवाला असाच फटका बसला असता पण थोडक्यात हुकला. गुगल मॅपने चुकीचा पत्ता दाखविल्याने हे नवरोबा दुसऱ्याच विवाह समारंभात पोहोचले आणि तेथील नवरदेव आलेला नसल्याने यालाच लोक वर समजले. अगदी शेवटच्या क्षणी सगळी चूक लक्षात आल्याने दुसऱ्या मुलीशी लागणारे लग्न टळले. Don’t rely on Google Maps, man nearly marries wrong woman
विशेष प्रतिनिधी
जाकार्ता : तंत्रज्ञानाच्या वापराने माणसाचे जीवन सुकर केले असले तरी कधी कधी त्याचा फटकाही बसू शकतो. इंडोनेशियातील एका नवरदेवाला असाच फटका बसला असता पण थोडक्यात हुकला. गुगल मॅपने चुकीचा पत्ता दाखविल्याने हे नवरोबा दुसऱ्याच विवाह समारंभात पोहोचले आणि तेथील नवरदेव आलेला नसल्याने यालाच लोक वर समजले. अगदी शेवटच्या क्षणी सगळी चूक लक्षात आल्याने दुसऱ्या मुलीशी लागणारे लग्न टळले.
जाकार्तातील ट्रिब्युन टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका गावात लग्न आणि साखरपुडा असे दोन वेगवेगळे कार्यक्रम होते. साखरपुडा असलेल्या कोम्पास या नवरदेवाचे वरहाड़ नियोजित ठिकाणी जाण्यासाठी निघाले. त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला होता.
मात्र, मॅपने त्यांना भलत्याच ठिकाणी नेले. याठिकाणी मारिआ आणि बुºहान सिद्दीकी यांचा विवाह होणार होता. या लग्नातील वऱ्हाड्यांना वाटले आपलेच पाहुणे आले आहेत. त्यामुळे त्यांची सरबराई सुरू करण्यात आली. त्यांना जेवणही देण्यात आले. त्यानंतर लग्नाचा समारंभ होणार होता. वधुचा मेकअप सुरू असल्याने त्याला काही वेळ लागला. मात्र, दरम्यानच्या काळात वऱ्हाड्यांच्या गप्पा सुरू झाल्यावर समजले की चुकीचे वऱ्हाड आहे. त्यामुळे विवाह समारंभ टळला. या सगळ्या गोंधळामुळे वऱ्हाड्यांची चांगलीच फजिती झाली.
Don’t rely on Google Maps, man nearly marries wrong woman
वाचा…
- मध्यप्रदेशामध्ये लॉकडाऊन लावणार नाही ; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सूतोवाच
- पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर लादणाऱ्या राजस्थान सरकारविरोधात पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन, एक दिवस राज्यातील सर्व पेट्रोलपंप बंद
- ऑक्सिजन पुरवठावाढ, रेमडेसिवीरचा जपून वापर आणि अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारण्यावर भर; कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा
- कोविड फक्त महाराष्ट्रातच का वाढतोय, निवडणूकांच्या राज्यात का नाही वाढत?; काँग्रेसचे मंत्री अस्लम शेरखान यांचा सवाल
- घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी आरोपीला पुण्यात बेड्या