• Download App
    Donald Trump's mind has changed from the Nobel Peace Prize to nuclear tests; There is no strategy left!! शांततेच्या नोबेल पासून अण्वस्त्र चाचण्यांपर्यंत डोनाल्ड ट्रम्पची फिरली मती; उ

    शांततेच्या नोबेल पासून अण्वस्त्र चाचण्यांपर्यंत डोनाल्ड ट्रम्पची फिरली मती; उरली नाही रणनीती!!

    Donald trump

    नाशिक : शांततेच्या नोबेल पासून अण्वस्त्र चाचण्यांपर्यंत डोनाल्ड ट्रम्पची फिरली मती; उरली नाही रणनीती!!, असंच म्हणायची वेळ अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच उधळलेल्या मुक्ताफळांवरून आली.Donald Trump’s mind has changed from the Nobel Peace Prize to nuclear tests; There is no strategy left!!

    अगदी महिनाभरापूर्वी पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचे नोबेल पारितोषिक मिळावे म्हणून जंग जंग पछाडले होते. त्यांनी बंद पाडलेल्या किंवा बंद न पाडलेल्या सगळ्या युद्धांचे परस्पर श्रेय घेतले होते. आपणच जगातली आठ युद्धे बंद पाडली. त्यामुळे आपलाच नोबेल शांतता पुरस्कार वर हक्क पोहोचतो, असे ते म्हणाले होते. त्यांच्या दाव्यातला खरा खोटेपणा त्यांनी स्वतःच तपासायची गरज नव्हतीच, पण ती नोबेल पुरस्कार समितीने व्यवस्थित तपासली आणि म्हणून नोबेल पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला नाही. त्यांच्या ऐवजी व्हेनेजुएला मधल्या कार्यकर्तीला तो पुरस्कार दिला.



    त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जरी भडकले होते तरी साधारण महिनाभरापूर्वीपर्यंत ते तसे “शांत” होते. आपण जगातली युद्ध थांबविल्याचा दावा करतच राहिले होते. त्यावेळी त्यांना पाकिस्तानने सुद्धा साथ दिली होती. डोनाल्ड ट्रम्प म्हणतील त्याला पाकिस्तानचे लष्करी आणि मुलकी असे दोन्ही राज्यकर्ते माना डोलवत होते. गाढवांचा अहो रुपम, अहो ध्वनी!!, असा खेळ चालला होता. तो तीन-चार महिन्यांपासून जगाने पाहिला होता.

    पण काही केल्याने आणि कुठेही काही आपटल्याने आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारच नाही हे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांची मती म्हणजेच बुद्धी फिरली. ती एवढी 360 अंशांमध्ये फिरली की त्यांनी अमेरिका आता अण्वस्त्र चाचण्या करणार, अशी घोषणा करून टाकली. त्यासाठी त्यांनी रशिया आणि चीन यांच्या युद्धखोरीला परस्पर जबाबदार ठरविले. रशिया आणि चीन हे दोन युद्धखोर देश आहेत ते हुकूमशाही राष्ट्र असल्याने ते छुप्या पद्धतीने अण्वस्त्र चाचण्या करतायेत पण आपण लोकशाहीवादी देश असल्याने जाहीरपणे सांगून अण्वस्त्र चाचणी करू असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले त्यापलीकडे जाऊन त्यांनी पाकिस्तान सुद्धा आता अण्वस्त्र चाचणी करेल, असे परस्पर जाहीर केले.

    आपण महिनाभरापूर्वीपर्यंत शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी उतावळे झालो होतो, हे डोनाल्ड ट्रम्प पुरते विसरून गेले. 150 वेळा पृथ्वी नष्ट होईल एवढी अण्वस्त्रे अमेरिकेकडे आहेत असे सांगून ते मोकळे झाले. पण या सगळ्यातून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची दुबळी आणि बावळट परराष्ट्रनीती सगळ्या जगासमोर उघडी पडली. कारण अमेरिकेने केलेले शांततेचे प्रयत्नही उथळ आणि युद्धाच्या दिलेल्या धमक्याही उथळ अशाच ठरल्या.

    – चीनचा थंडा प्रतिसाद

    जगातली कुठलेच देश अण्वस्त्र चाचण्या करताना ओरडून सांगत नाहीत आपले लष्करी सामर्थ्य जाहीरपणे दणकावत नाहीत, पण हे सगळे डोनाल्ड ट्रम्प यांनी उथळपणे केले. त्या उलट चीनने त्यांना थंडा प्रतिसाद दिला. चीन एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे. आम्ही स्वतःहून अण्वस्त्र चाचण्या थांबवल्यात त्या पुन्हा सुरू केलेल्या नाहीत एवढे दोन ओळींचे उत्तर चिनी परराष्ट्र मंत्रालयाने जारी करून डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडले.

    Donald Trump’s mind has changed from the Nobel Peace Prize to nuclear tests; There is no strategy left!!

    महत्वाच्या बातम्या

    
    					

    Related posts

    Trump : ट्रम्प म्हणाले – जिनपिंग यांना तैवानवर हल्ल्याचा परिणाम माहिती; आमच्याकडे जगाला 150 वेळा नष्ट करण्यासाठी पुरेशी अण्वस्त्रे, तरीही टेस्ट आवश्यक

    Vote chori V/S Vote jihad : ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने दिली भाजपला संधी; आशिष शेलारांनी वाचली मुस्लिम दुबार मतदारांची यादी!!

    जयराम रमेश यांनी बिहारच्या निवडणुकीत बेलछीची आठवण काढणे ठीक आहे; पण सध्याच्या काँग्रेस नेतृत्वामध्ये ते spirit उरलेय का??