• Download App
    Donald Trump इराण आणि इजराइलने शस्त्रसंधी तोडल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिल्या शिव्या

    इराण आणि इजराइलने शस्त्रसंधी तोडल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिल्या शिव्या

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : इराणने कतार मधल्या अमेरिकी हवाई तळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणला प्रतिहल्ला करून उत्तर दिले नाही. इराणने “बदला” घेतला. तो देश आता शांत होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. त्यांनी पहाटे शस्त्रसंधी घोषित केली होती. पण प्रत्यक्षात इराण शांत बसला नाही. त्याने इजरायलवर हल्ला केला. त्यामुळे इजरायलने इराणवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे आखातात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली.

    मात्र त्यावरून डोनाल्ड ट्रम्प जास्त भडकले इराण आणि इस्रायल यांनी शस्त्रसंधी तोडून एकमेकांवर हल्ले केल्याबद्दल ट्रम्प यांनी दोन्ही देशांना शिव्या दिल्या. दोन देश उगाच भांडत आहेत. They don’t know what the f*** they are doing असे उद्गार ट्रम्प यांनी काढले.

    हल्ले थांबवण्याची कबुली दोन्ही देशांनी दिली होती म्हणून शस्त्रसंधी घोषित केली. पण दोन्ही देशांनी ती तोडली. त्यामुळे आपण दोन्ही देशांविषयी समाधानी नाही, की फटकार देखील ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांना लगावली. त्यानंतर ते नेदरलँडच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले.

    इराण आणि इजरायल यांच्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील दोन्ही देशांनी त्यांचे न ऐकता एकमेकांवर हल्ले केले म्हणून ट्रम्प यांचा संयम सुटला ते भडकले आणि त्यांनी शिवीगाळ केली ही शिवीगाळ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली.

    Donald Trump slams Iran and Israel for breaking ceasefire

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत