डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती युरोपियन राष्ट्रप्रमुखांची “शाळा”; पण SCO मध्ये भारत चीन आणि रशिया यांच्यासह महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांचा भरला समानता मेळा!! हे परस्पर विरोधी आणि परस्पर विसंगत चित्र समोर आले. Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकेचे जे परराष्ट्र धोरण आखाले, त्यातून पूर्व आणि पश्चिम यांच्यातील दरी तर रुंदावलीच, पण अमेरिकेची दादागिरी जास्त बोलभांड झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचे सभ्य संकेत आणि भाषा झुगारून परराष्ट्र संबंधांमध्ये उथळ आणि गावठी भाषा आणली. अमेरिकन वर्चस्ववादाचे उथळ प्रदर्शन मांडले. यातूनच त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धासंदर्भात युरोपियन नेत्यांची मध्यंतरी “शाळा” घेतली होती.
– ट्रम्प मास्तरांची “शाळा”
द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चांमध्ये सर्वसाधारणपणे दोन किंवा अनेक देशांचे नेते समान पातळीवर भेटतात. समान अंतर राखून त्यांच्या बसण्याची आणि बोलण्याची व्यवस्था केली जाते. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी तो संकेत झुगारला होता. त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मुख्य ओव्हल ऑफिसमध्ये सगळ्या युरोपियन राष्ट्र प्रमुखांना आणि सरकार प्रमुखांना बोलवून आपल्यासमोर बसायला लावले होते. ते स्वतः अध्यक्षांच्या मुख्य खुर्चीवर बसले होते आणि युरोपियन नेते त्यांचे दुय्यम स्थान असल्यासारखे ट्रम्प यांच्यासमोर अनेक खुर्च्यांवर “बसविले” होते. त्यामध्ये ब्रिटन + फ्रान्स + जर्मनी + इटली यांच्यासारख्या बड्या युरोपियन देशांच्या सरकार प्रमुखांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय संकेत झुगारणारी ही बैठक व्यवस्था मुद्दामून करण्यात आली होती. ट्रम्प यांनी युरोपियन नेत्यांची “शाळा” घेतली, ट्रम्प मास्तर आणि युरोपियन नेते विद्यार्थी अशी “व्यवस्था” केली होती, याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगली होती. पण अमेरिकेच्या पुढे झुकणाऱ्या युरोपियन नेत्यांना तो अपमान झोंबला नव्हता. कारण हे सगळे अमेरिकेच्या प्रचंड प्रभावाखाली असलेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच NATO चे सदस्य देश आहेत. मूळातच त्यांच्यात पाश्चिमात्य अहंकार आणि वर्चस्ववादाचा दर्प आहे. पण तो कायमच अमेरिकेपुढे झुकला आहे.
– SCO मधली समानता
या पार्श्वभूमीवर चीन मधल्या तिनजिआंग मध्ये भरलेल्या शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO शिखर संमेलनातील बैठक व्यवस्था समान पातळीवरची ठेवली होती. भारत + चीन + रशिया + इंडोनेशिया + म्यानमार + तुर्की + कझाकस्तान + किरगिझस्तान + नेपाळ + मालदीव + मलेशिया + कंबोडिया + उझबेकिस्तान + अर्मेनिया + तुर्कमेनिस्तान + व्हिएटनाम + ताजिकिस्तान + बेलारूस + इजिप्त + पाकिस्तान आदी 25 देशांच्या सरकार प्रमुखांना आणि राष्ट्रप्रमुख यांना समान वागणूक देण्यात आली होती. या सगळ्या देशांमधल्या राजनैतिक + सामरिक + आर्थिक + सांस्कृतिक + सामाजिक + धार्मिक परिस्थितीमध्ये आणि सामर्थ्यामध्ये प्रचंड भिन्न भिन्नता असली तरी SCO सदस्य देशांमध्ये शिखर बैठकीत कुठलाही भेदभाव केला गेला नव्हता.
– मतभेदांमध्ये देखील राजनैतिक संकेतांना महत्त्व
SCO मध्ये भारत + चीन आणि रशिया हे तीन देश सगळ्यात सामर्थ्यशाली आहेत. पण या तिन्ही देशांनी वेगवेगळे किंवा एकत्र येऊन SCO मध्ये स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून एकमेकांवर आणि इतरांवर कुरघोडी करायचा प्रयत्न केला नाही. निदान शिखर बैठकीत तसे दाखविले तरी नाही. चीन भारत आणि रशिया यांनी सर्व आंतरराष्ट्रीय संकेत पाळून समानतेच्या नात्याने SCO बैठकीतली राजनैतिक वर्तणूक ठेवली होती. तिथे कुणी कुणाची “शाळा” घेतली नाही. छोट्या देशांच्या राष्ट्र प्रमुखांना किंवा सरकार प्रमुखांना दुय्यम स्थान दिले नाही. राजनैतिक संकेत झुगारून गावठी भाषा वापरली गेली नाही. चीन भारत किंवा रशिया यांच्या राष्ट्र प्रमुखांनी + सरकार प्रमुखांनी कुणावर बोलभांड दादागिरी केली नाही. गंभीर मतभेदांच्या मुद्द्यावर तितकेच गंभीर चर्चा केली. मतभेदाचे मुद्देही तेवढेच गंभीर ठेवले. त्यांना कुठलेही उथळ स्वरूप येऊ दिले नाही.
Donald Trump schooled EU leaders; but SCO gave equal treatment to member countries
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!
- Gujarat : गुजरातेत माजी आमदार, IPS सह 14 जणांना जन्मठेप; सुरतेत बिल्डरचे अपहरण करून 12 कोटींचे बिटकॉइन ट्रान्सफर केले
- Droupadi Murmu : जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे भारत-चीन संबंध सुधारल्याचा दावा; राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिले- ट्रम्पच्या टॅरिफमुळे आम्हाला त्रास
- Mahua Moitra controversial statement : महुआ मोइत्रांना अमित शाहांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार?: पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल