वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “चीन – पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर” अर्थात ‘सीपेक’ प्रकल्पासाठी चिनी अभियंते सध्या पाकमध्ये कार्यरत आहेत. मात्र, तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर हिंसक विरोधाचा सामना करावा लागत आहे. नुकताच म्हणजे १४ जुलै रोजी खैबर पख्तुनख्वा प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात ९ चिनी अभियंते ठार झाले होते. CHINESE ENGINEERS FORCED TO ARM THEMSELVES WHILE WORKING ON CPEC PROJECTS, PAK ARMY SPECIAL SECURITY DIVISIONS FAIL SPECTACULARLY
त्यामुळे त्यांना पाकिस्तानी लष्करावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे चीनने आता आपल्या अभियंत्यांना एके ४७ रायफल्स घेऊन काम करण्याचे आदेश दिले आहेत. चिनी अभियंते रायफल्स घेऊन काम करत असल्याची छायाचित्रे सध्या चिनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत.
भारतीय सैन्य दलाने याची दखल घेतली असून त्यातील काही छायाचित्रे प्रसिद्धीला ही दिली आहेत सीपेक हा चीनचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पाकिस्तानी सरकारचा आणि लष्कराचा त्याला पाठिंबा आहे. परंतु बलुचिस्तानमध्ये त्याला प्रचंड विरोध आहे. बलुचिस्तान चे सर्व नैसर्गिक स्त्रोत वापरून चीन स्वतःची समृद्धी करू पाहत आहे आणि त्याला पाकिस्तान सरकार मदत करत आहे या बाबींमुळे बलुचिस्तानात प्रचंड असंतोष आहे
या असंतोषाचे प्रतिबिंब खैबर पख्तूनख्वा प्रांतात उमटले आणि तेथे काही बंडखोरांनी मोठे स्फोट घडवून आणले. यात चिनी अभियंत्यांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर चिनी अभियंत्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी एके 47 रायफली हातात घेऊन काम करावे लागत आहे
CHINESE ENGINEERS FORCED TO ARM THEMSELVES WHILE WORKING ON CPEC PROJECTS, PAK ARMY SPECIAL SECURITY DIVISIONS FAIL SPECTACULARLY
महत्त्वाच्या बातम्या
- दैनिक भास्करच्या मालकांच्या घर आणि कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, करचोरीचा आरोप
- पॉर्न चित्रपट प्रकरणात कुंद्राच्या कार्यालयावर छापा : पॉर्न सामग्री अपलोड करणारा सर्व्हर जप्त
- सीएए, एनआरसीचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर – संरसंघचालक भागवत यांची टीका
- उत्तर प्रदेशात आता चक्क फुलनदेवीचे १८ पुतळे उभारले जाणार
- नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला