विशेष प्रतिनिधी
बीजिंग – अफगाणिस्तानची सूत्रे आपल्या हातात घेतलेल्या तालिबानी सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मान्यता मिळवून देण्यासाठी चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मात्र त्यांना दीर्घकालिन धोक्यांची जाणीव करून दिली आहे. सैन्यमाघारीवरून टीका सहन कराव्या लागलेल्या अमेरिकेचे शत्रुत्व या दोन्ही देशांना पत्करावे लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी चीन आणि पाकिस्तानला दिला आहे. China, Pakistani role in Afghan is dangourous for both
तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार, तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळविल्यापासून अमेरिकेचा पराभव झाल्याच्या भावनेने आनंदून जात चीन आणि पाकिस्तानने अनेक पातळ्यांवर चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तालिबानबरोबरच अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी अफगाणिस्तानात मुक्तपणे फिरत असल्याने दहशतवाद फोफावण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाकिस्तानने जाहीररित्या तालिबानी सत्तेला अद्याप मान्यता दिली नसली तरी तालिबानकडे सूत्रे गेल्याने पाकिस्तान सरकार समाधानी असल्याचे एका पाकिस्तानी विश्लेेषकानेच म्हटल्याचे हाँगकाँगमधील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
काबूल तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, ‘अफगाण नागरिकांनी पाश्चिचमात्यांच्या गुलामगिरीचे जोखड फेकून दिले,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यास तालिबानला भाग पाडण्याच्या नावाखाली, त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय पातळीवरून राजनैतिक चर्चा करण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांशी, विशेषत: चीन आणि रशियाशी संवाद साधत आहे. चिनी माध्यमांमध्येही अमेरिकेच्या पराभवाची सखोल चर्चा केली जात आहे.
China, Pakistani role in Afghan is dangourous for both
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद