विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाख मधली हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा घेतल्याचा दावा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक नेते करतात. मात्र लडाख केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा यांनी हा दावा परखड शब्दांत फेटाळून लावला आहे.China has not been able to capture even an inch of Ladakh’s land; Lieutenant Governor Brigadier B. D. Mishra slaps Rahul Gandhi
1962 मध्ये काय झाले असेल, ते जुने झाले. पण त्यानंतर चीन लडाखची एक इंचही भूमी कब्जात घेऊ शकलेला नाही. कारण आपले सर्व सैन्यबळ पूर्णपणे अलर्ट आहे. भारताच्या भूमीवर कब्जा करणाऱ्यांना जबरदस्त रक्तबंबाळ करणारा तडाखा मिळेल हे चिनी सरकार पक्के जाणून आहे. कोणा एका नेत्याच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, पण मी लडाखच्या भूमीतली वस्तूस्थिती पाहिली आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो की चीनने भारताच्या भूमीवर एक इंचही कब्जा केलेला नाही किंबहुना करू शकलेला नाही, असे परखड बोल ऐकवत मिश्रा यांनी राहुल गांधींना आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांना चपराक हाणली आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाख मधल्या भूमीवर घुसखोरी करून हजारो स्क्वेअर किलोमीटर भूमी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी संसदेतही करून पाहिला. पण त्यांना संसदेत सरकारने चोख प्रत्युत्तर दिले. आता देखील प्रत्यक्ष लडाख मध्ये काम केलेल्या आणि सध्या लडाखचे उपराज्यपाल असलेल्या बी. डी. मिश्रा यांनी परखड बोल सुनावत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना चपराक हाणली आह
China has not been able to capture even an inch of Ladakh’s land; Lieutenant Governor Brigadier B. D. Mishra slaps Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या