विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनच्या ‘चँग ५’ या या चंद्रावर उतरलेल्या लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा पहिला थेट पुरावा सापडला आहे. यामुळे चंद्राबाबतच्या संशोधनाला बळ मिळाले आहे.China get proof about water on moon
चीनचे चँग-५ हे अवकाशयान चंद्रावरील सर्वांत कमी आयुर्मान असलेल्या एका बेसाल्ट खडकावर उतरविण्यात आले आहे. या यानाने १,७३१ ग्रॅम वजनाचे मातीचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. यान ज्याठिकाणी उतरले त्याच ठिकाणी पाण्याचे पुरावे सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
याबाबतचा अभ्यास ‘सायन्स’ या नियतकालिकात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. यानुसार, चंद्रावर चीनचे ‘चँग ५’ हे लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्यात पाण्याचा अंश आढळला असल्याचे ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
यानुसार, या मातीमध्ये प्रतिटन १२० ग्रॅम पाणी आढळले. पृथ्वीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. खडकांच्या नमुन्यांतही पाण्याचा अंश आढळून आला आहे. सौर वाऱ्यांमुळे चंद्रावर आर्द्रता वाढते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
China get proof about water on moon
महत्त्वाच्या बातम्या
- हरिद्वारमधील धर्मसंसदेचा वाद आता पोहोचला सर्वोच्च न्यायालयात
- खलिस्थानवाद्यांनी घेतली पंतप्रधानांचा ताफा अडविल्याची जबाबदारी, चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही धमकी
- ममता गोव्यात येऊन राजकीय पायरोवा करू शकतात, पण शिवसेना – राष्ट्रवादी का नाही करू शकत??
- रयतमधील गैरकारभार,भ्रष्टाचाराचा शिवसेनेच्या आमदाराकडून भांडाफोड, बारामतीतील एक जण आहे ‘कलेक्टर’, शरद पवारांनी अध्यक्षपद सोडविण्याची मागणी