• Download App
    canada united kingdom bans on Indians

    भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

    canada united kingdom bans on Indians

    विशेष प्रतिनिधी

    टोरांटो : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारत आणि पाकिस्तानमधून उड्डाण करणाऱ्या प्रवासी विमानांवर कॅनडाने तीस दिवसांसाठी बंदी जाहीर केली आहे. कॅनडाने आतापर्यंत जाहीर केलेली ही सर्वांत दीर्घकाळाची प्रवासबंदी आहे. संसर्गवाढीमुळे ब्रिटन,ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरनेही भारतावर तात्पुरती प्रवासबंदी लागू केली आहे. canada united kingdom bans on Indians

    भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कॅनडाने बंदी घातली असली तरी मालवाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उलट, भारताकडून कॅनडाला १५ लाख लशींची निर्यात होणे अपेक्षित असल्याचे कॅनडाच्या वाहतूक मंत्र्यांनी सांगितले.



    मागील १४ दिवसांमध्ये भारतात प्रवास केलेल्या कोणत्याही प्रवाशाला सिंगापूरमध्ये प्रवेश करण्यास किंवा सिंगापूरमार्गे प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. मागील १४ दिवसांमध्ये भारतात प्रवास केलेल्या कोणत्याही प्रवाशाला सिंगापूरमध्ये प्रवेश करण्यास किंवा सिंगापूरमार्गे प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २४) हे निर्बंध लागू असतील.

    भारतातील संसर्गवाढीमुळे ब्रिटनने ‘रेड लिस्ट’मध्ये नाव समाविष्ट केल्यानंतर आता या देशाने आजपासून भारतावर नवे निर्बंध लागू केले आहेत. यामुळे भारतातील प्रवाशांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    canada united kingdom bans on Indians


    महत्वाच्या’ बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या