शुक्रवारची नमाज सुरू असताना हा भीषण बॉम्बस्फोट झाला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या बलागन प्रांतातील जमान मशिदीमध्ये भीषण स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ नमाजी ठार झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. यामुळे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. Bomb blast in mosque in Afghanistan 17 dead, many injured
या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही मशीद शिया समुदायाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्फोट शिया मशिदीत झाला. अधिकाऱ्यांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढले आहे. मदत आणि बचावकार्य अजूनही सुरू आहे.या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या मशीदमध्ये बॉम्बस्फोट झाला तो शिया समुदायाचे प्राबल्य असलेला भाग आहे. शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये नेहमीच कटुता असते. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट शिया मशिदीत झाला. जखमी आणि मृतांची पाहणी करण्यासाठी अधिकारी रुग्णालयांमध्ये पोहोचत आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Bomb blast in mosque in Afghanistan 17 dead many injured
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण