Saudi Arabia does not allow Hajj to foreign countries : सौदी अरेबियाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी 60 हजारांहून अधिक लोकांना हजची परवानगी दिली जाणार नाही. हजला जाणारे सर्व स्थानिक असतील. सरकारद्वारे संचालित सौदी प्रेस एजन्सीच्या हज आणि उमराह मंत्रालयाचा हवाला देत एका निवेदनात ही घोषणा करण्यात आली. Big news Due To Corona Pandemic Saudi Arabia does not allow Hajj to foreign countries this year, only 60,000 locals allowed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सौदी अरेबियाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी 60 हजारांहून अधिक लोकांना हजची परवानगी दिली जाणार नाही. हजला जाणारे सर्व स्थानिक असतील. सरकारद्वारे संचालित सौदी प्रेस एजन्सीच्या हज आणि उमराह मंत्रालयाचा हवाला देत एका निवेदनात ही घोषणा करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी हज जुलैच्या मध्यापासून सुरू होईल. यामध्ये 18 ते 65 वयोगटातील लोक सहभागी होऊ शकतील. मंत्रालयाने म्हटले आहे की, हज यात्रेकरूंना लसी देणे बंधनकारक आहे. “यात्रेकरूंचे आरोग्य आणि त्यांच्या देशाच्या सुरक्षेबाबत सातत्याने विचारविनिमय केल्यानंतर सौदी अरेबियाने हा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मागील वर्षी सौदी अरेबियात आधीच राहणाऱ्या सुमारे एक हजार लोकांना हजसाठी निवडले गेले होते. सामान्य परिस्थितीत दरवर्षी सुमारे 20 लाख मुस्लिम हज करतात.
अलीकडेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, हज यात्रेसंदर्भात सौदी अरेबियाने घेतलेल्या निर्णयावर भारत साथ देईल. त्यांनी सांगितले होते की, आम्ही आमच्याकडून सर्व तयारी केली आहे. हज यात्रेसाठी आम्ही लोकांकडून अर्जही घेतले आहेत.
सौदी अरेबियाच्या सरकारने पूर्वी जाहीर केले होते की, यावर्षी जगभरातील 60 हजार लोक हज करण्यास सक्षम असतील, त्यातील 15 हजार सौदी अरेबियाचे नागरिक असतील, तर इतर देशांतील 45 हजार लोकच सौदीला जाऊ शकतील. तथापि, आता सौदी सरकारने हे स्पष्ट केले आहे की, या वेळी बाहेरील देशातील कोणालाही हज यात्रेची परवानगी मिळणार नाही.
Big news Due To Corona Pandemic Saudi Arabia does not allow Hajj to foreign countries this year, only 60,000 locals allowed
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार- प्रशांत किशोर भेट, तीन तासांच्या भेटीत 2024 ची रणनीती तयार?, वाचा काय म्हणाले नवाब मलिक!
- राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे
- ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान
- अमेरिकेत फेडरल जज बनणारे पहिले मुस्लिम बनले जाहिद कुरेशी, सिनेटने दिली मान्यता
- पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद