वृत्तसंस्था
ढाका : पाकिस्ताननंतर बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ५० हून अधिक मूर्तींचे कट्टरवाद्यांनी नुकसान केले आहे.पाकिस्तानातील सिद्धिविनायक मंदिरातकाही दिवसांपूर्वी तोडफोड झाली होती. आता त्याचे लोन बांगलादेशात पोचले आहे.त्यामुळे तमाम हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे.Bangladesh radical attacks and destroyed hindu god temples ; looted hindu religious clash
खुलना जिल्ह्यातील शियाली, मल्लिकापुरा आणि गोवरा या गावात अचानक शेकडो कट्टरपंथी घुसले. त्यांनी परिसरातील ६ हिंदू मंदिरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेत ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान झाले आहे. या गावांमधील ५७ हून अधिक हिंदू घरांमध्ये घुसून लूटमार केली आहे. या भागातील दुकानेही लुटून नेली असून, या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
वाद कसा पेटला?
शुक्रवारी (६ ऑगस्ट २०२१ रोजी) नमाज पठणावेळी कीर्तन करण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, या दोन गटातील तणाव दंगलीचे स्वरुप धारण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, असे म्हटले जात असून, या घटनेला स्थानिक पातळी तसेच आकाशवाणीने दुजोरा दिला आहे.
विश्व हिंदू परिषदेने घेतली दखल
बांगलादेशमधील स्थानिक मीडियामध्ये याबाबत अवाक्षर काढले गेले नाही. तसेच पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत स्थानिक हिंदू संघटनांनी केला असून निंदा केली. दुसरीकडे भारतातील विश्व हिंदू परिषदेकडून या घटनेची दखल घेत आंतरराष्ट्रीय संघटनांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे.
पाकिस्तान पुन्हा मंदिरावर हल्ला
पाकिस्तानात पुन्हा एका मंदिरावर हल्ला चढविण्यात आला आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात सिद्धिविनायक मंदिर आहे. बुधवारी काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, यानंतर तेथे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
मंदिरावर का होतात हल्ले
हिंदूंच्या मंदिरावर हल्ले चढविण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. हिंदूंमध्ये मूर्ती पूजा होते. पण, अन्य धर्मीयांमध्ये विशेषतः इस्लाममध्ये मूर्तिपूजा निषिद्ध आहे. याचा अर्थ असा नाही की, ती अन्य धर्मियांनी करू नये. परंतु, धर्मांध मुस्लिम धर्मगुरू मूर्तिपूजेविरोधात लोकांची माथी फिरवत असल्याने या घटना वाढत आहेत. शुक्रवारच्या नमाजावेळी मुस्लिम धर्मगुरू मूर्तिपूजेविरुद्ध गरळ ओकत असल्याने
मशिदीतून बाहेर पाडणाऱ्या झुंडी मंदिरावर चालून जात असून तेथे तोडफोड केली जात आहे.
पाकिस्तान, बांगलादेश ही दोन्ही मुस्लिम राष्ट्र आहेत. तेथे धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता नावालाही नाही. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे बाटलेले आणि धर्मांतरित झालेले हिंदूच आता धर्माच्या नावाखाली मंदिरावर हल्ले चढवत आहेत. त्याला मुस्लिम धर्मगुरूंची फूस मिळत असल्याने ते मंदिरांवर हल्ले वाढत आहेत. तेथील सरकारही अल्पसंख्याक म्हणजे हिंदूंवर आणि मंदिरांवर होणारे हल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
Bangladesh radical attacks and destroyed hindu god temples ; looted hindu religious clash
महत्त्वाच्या बातम्या
- आमदार कपिल पाटील, डॉ. गणेश देवी यांचा राष्ट्र सेवा दलात मनमानी कारभार, पदाधिकाऱ्यांचा आरोप ; क्रांती दिनी पुरस्कार केले परत
- बिल्डर अविनाश भोसले यांची आणखी ४ कोटींची संपत्ती जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई
- भुजबळांचा बाप काढला, राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा केली, शिवसेना खासदाराच्या १० मिनिटांच्या भाषणाने महाविकास आघाडीत संघर्ष पेटणार
- नारायण राणे कोकणासह मुंबईमध्येही घेणार जन आशीर्वाद सभा; २० ऑगस्टपासून दौरा