विशेष प्रतिनिधी
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-19 संकटावर फोनवर चर्चा झाली. याबाबत माहिती देताना मॉरिसन यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. ऑस्ट्रेलिया व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर देऊन भारताला मदत करत आहे. आम्ही करोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही. जागतिक आव्हानांवर आमचं बारकाईने लक्ष आहे.Australia PM Morrison dials PM Modi to thank India for COVID vaccines; under fire over IPL
भारत सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. यात दररोज 3-4 लाख नव्या करोना रुग्णांची नोंद होत आहे.
दर दिवशी 3 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. भारतात सापडलेल्या नव्या करोना विषाणूंच्या व्हेरिएंटमुळे करोना संसर्गाने रौद्र रुप धारण केल्याचे बोलले जात आहे.
2 दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पेनी यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलिया या संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचे म्हटले होते. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची पहिली खेप विमानाने पाठवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यानंतर भारत सरकारकडूनही लगेचच ट्विट करत आभार मानले होते.
भारताकडून ऑस्ट्रेलियाला मदतीसाठी धन्यवाद
2 दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पायने (Marise Payne) यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलिया या संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचं म्हटलं. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची पहिली खेप विमानाने पाठवली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यानंतर भारत सरकारकडूनही लगेचच ट्विट करत आभार मानले होते. ऑस्ट्रेलियामधील भारतीय उच्चायोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘जागतिक साधीरोगाविरोधात लढण्यासाठी योग्यवेळी मदत केल्याबद्दल पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि मंत्री मॅरिस पायने यांचे आभार.
Australia PM Morrison dials PM Modi to thank India for COVID vaccines; under fire over IPL