• Download App
    हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा २४ पट अधिक शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्यात अमेरिका व्यस्त! America is busy making a nuclear bomb 24 times more powerful than the bomb dropped on Hiroshima

    हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा २४ पट अधिक शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्यात अमेरिका व्यस्त!

    म्हणजेच अणुबॉम्बची संख्या वाढणार नाही, पण त्याचा साठा अधिक धोकादायक होईल.

    विशेष प्रतिनिधी

     पेंटागॉन  : अमेरिका नवा शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा तो 24 पट अधिक शक्तिशाली असणार आहे. America is busy making a nuclear bomb 24 times more powerful than the bomb dropped on Hiroshima

    अमेरिकन संरक्षण विभागाच्या घोषणेनुसार, हा B61 आण्विक गुरुत्वाकर्षण बॉम्बची आधुनिक आवृत्ती असेल, ज्याला B61-13 असे नाव देण्यात आले आहे. आता त्याला संसदेची मान्यता घ्यावी लागेल. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, पेंटागॉनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बी61-13 ‘ऊर्जा विभागाच्या राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासन’द्वारे तयार केले जाईल. 360 किलोटन वजनाचा B61-13 अणुबॉम्ब B61-7 ची ​​जागा घेईल, म्हणजेच अणुबॉम्बची संख्या वाढणार नाही, पण त्याचा साठा अधिक धोकादायक होईल.

    नवीन बॉम्बच्या तुलनेत हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बचे वजन 15 किलोटन होते, तर नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचे वजन 25 किलोटन होते. सोप्या शब्दात सांगायचे तर, नवा बॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 14 पट अधिक शक्तिशाली असेल.

    America is busy making a nuclear bomb 24 times more powerful than the bomb dropped on Hiroshima

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    AI-Generated Nude Photo : खासदाराचा धक्कादायक प्रयोग: स्वतःचा एआय-निर्मित न्यूड फोटो संसदेत दाखवत डिपफेकचा धोका उघड

    Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दूर होताच इलॉन मस्कचा मास्टरस्ट्रोक!

    Hindu-Buddhist temple : बांगलादेशने नोटांवरून माजी राष्ट्रपतींचे चित्र हटवले; नवीन नोटेवर हिंदू-बौद्ध मंदिरांचे चित्र