• Download App
    सगळे शीख सच्चे भारतीय, त्यांना खलिस्तान नकोय; इंडो - अमेरिकन बिझनेसमन संत सिंग चटवाल यांनी सुनावले|All Sikhs are true Indians, they don't want Khalistan; Narrated by Indo-American businessman Sant Singh Chatwal

    सगळे शीख सच्चे भारतीय, त्यांना खलिस्तान नकोय; इंडो – अमेरिकन बिझनेसमन संत सिंग चटवाल यांनी सुनावले

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली कॅनडा खलिस्तानी फोर्सेसना चिथावणी देत असल्याच्या पार्श्वभूमी भारतीय अमेरिकन बिझनेसमन संत सिंग चटवाल यांनी कॅनडाला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. भारतातलेच काय, पण जगातले सगळे शीख सच्चे भारतीय आहेत. भारतावर त्यांचे सच्चे प्रेम आहे. त्यांना खलिस्तान बिलकुलच नको आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच खलिस्तानी समर्थक आहेत, असे संत सिंग चटवाल म्हणाले. All Sikhs are true Indians, they don’t want Khalistan; Narrated by Indo-American businessman Sant Singh Chatwal



    भारत – कॅनडा वादावर आणि खलिस्तान दहशतवादी प्रवृत्तींवर संत सिंग चटवाल परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, की ​​ गेल्या 50 वर्षांपासून मी अमेरिकेत आहे. नेहमी मी हिंदुस्थानात येत असतो. सगळे शीख सच्चे भारतीय आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच खालिस्तानी समर्थक आहेत. मला माहिती नाही की त्यांना कोण निधी देते?? ​​पण मला एक शीख असल्याचा अभिमान आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात खूप चांगले काम सुरू आहे. भारतात शीख मोठ्या पदांवर आहेत. ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती होते. डॉ. मनमोहन सिंग 10 वर्षे पंतप्रधान होते. अनेक लष्कर प्रमुख, हवाईदल प्रमुख, नौदल प्रमुख शीख समुदायातले वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत. हरदीप सिंग पुरी आता मंत्री आहेत. भारतातले अमेरिकेतले राजदूत देखील शीख आहेत, याची आठवण संत सिंग चटवाल यांनी करून दिली.

    आज मुठभर लोक खलिस्तांचे समर्थक करताना दिसतात, पण ते कधी भारतात गेलेलेच नाहीत. उत्तर अमेरिकेतील शीख समुदाय या नात्याने आम्ही इथे चांगल्या सुविधा उपभोगत आहोत. आम्ही भारतावर प्रेम करतो. आम्ही भारत येतो. लोकांना भेटतो. पंतप्रधान मोदींची धोरणे योग्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. काही लोक गैरसमज पसरवत राहतात. आम्ही सर्व शीख भारतावर प्रेम करतो. भारत हा आमचा देश आहे. खलिस्तान निर्मितीत कुणालाही रस नाही, असे परखड उद्गार संत सिंग चटवाल यांनी काढले.

    All Sikhs are true Indians, they don’t want Khalistan; Narrated by Indo-American businessman Sant Singh Chatwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या