• Download App
    तालिबानविरोधी अफगाण रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद अजूनही अफगाणिस्तानातच ahmed Masood is still in Afghanistan

    तालिबानविरोधी अफगाण रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद अजूनही अफगाणिस्तानातच

    विशेष प्रतिनिधी

    तेहरान : तालिबानविरोधी अफगाण रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद हा अफगाणिस्तानातच असून तो शेजारील देशात पळून गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा इराणमधील ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने केला आहे. मसूद या सुरक्षित ठिकाणी असून पंजशीर खोऱ्यातील इतर सहकाऱ्यांच्या तो संपर्कात आहे, असे या वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटले आहे. ahmed Masood is still in Afghanistan



    मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये पळून गेल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला होता. पंजशीर खोऱ्याचा ७० टक्के भाग आणि येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग तालिबानच्या ताब्यात असला तरी खोऱ्यातील काही भागांवर अद्यापही मसूद यांच्या आघाडीची पकड असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
    दरम्यान तालिबानचे कट्टर विरोधक आणि अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अब्दुल रशीद दोस्तम यांची काबूल हवेली तालिबान्यांनी ताब्यात घेतली आहे.

    भ्रष्टाचारातून मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर दोस्तम यांनी ही हवेली बांधल्याचा तालिबानचा आरोप आहे. प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या हवेलीमध्ये अनेक अलिशान वस्तू असून एखादा श्रीमंत राजाचा महाल वाटावा, इतकी ही हवेली भव्य आहे. यामध्ये अनेक अत्याधुनिक सोयीसुविधाही आहेत. या हवेलीमध्ये सध्या तालिबानी दहशतवादी फिरत आहेत.

    ahmed Masood is still in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार