- याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यानंतर त्यांचे भाऊ अजित सिंह यांचेही निधन झाले आहे. गोगामेडी यांच्या घरात घुसून गोळी झाडली तेव्हा अजित सिंहही घटनास्थळी उपस्थित होते.After Sukhdev Singh Gogamedi now brother Ajit Singh also died
भाऊ सुखदेव सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्याच्यावरही गोळीबार केला. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा तत्काळ मृत्यू झाला, मात्र भाऊ अजित सिंह गंभीर जखमी होते.
सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजित सिंह यांच्यावर ५ डिसेंबरपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये गोळी लागून जखमी झालेला भाऊ अजित सिंह यांचाही मृत्यू झाला आहे.
यानंतर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसएमएस हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर जोरदार निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.
After Sukhdev Singh Gogamedi now brother Ajit Singh also died
महत्वाच्या बातम्या
- सुरक्षाभंग करून लोकसभेत घुसखोरी; दिल्ली पोलिसांनी दिली “ही” महत्त्वाची माहिती!!
- संसदेत सुरक्षाभंग करून घुसलेल्या तीन घुसखोरांपैकी एकजण लातूरचा; दोघांनी मारल्या उड्या!!; एकाला संसदेबाहेरच अटक
- केरळच्या राज्यपालांचा रस्त्यावर पाठलाग, मुख्यमंत्री लोक पाठवत असल्याचा आरोप; पोलिसांचीही मिलीभगत
- लोकसभेत सुरक्षेचा भंग; प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांची सभागृहात उड्या; संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतीदिनी गंभीर घटना!!