हमासने 24 ओलिसांना सोडले तर इस्रायलनेही 39 पॅलेस्टिनी कैद्यांना केले मुक्त!
विशेष प्रतिनिधी
गाझा : इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात ऑक्टोबर 7 पासून (इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष) युद्ध सुरू आहे. 49 दिवसांच्या युद्धानंतर, इस्रायल आणि हमास यांच्यात 4 दिवसांचा युद्धविराम झाला आहे. त्याबदल्यात हमासने 24 ओलिसांची सुटका केली आहे. यामध्ये 13 इस्रायली, 10 थायलंडचे नागरिक आणि फिलिपाइन्सच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांना गाझा पट्टीतील रेडक्रॉस सोसायटीच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचबरोबर इस्रायलने 39 पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली आहे. After 49 days of war between Israel and Hamas
आखाती देश कतारने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारामध्ये मध्यस्थी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही यात भूमिका होती.
‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, हमासने 13 इस्रायली ओलिसांची सुटका केली आहे. यामध्ये 4 मुले आणि 6 प्रौढ महिलांचा समावेश आहे. सर्व ओलीस इजिप्तच्या रफाह सीमेवरून इस्रायलला पोहोचले आहेत. ओलिसांना परत आणण्यासाठी इस्रायलने या कारवाईला ‘हैवन्स डोर’ असे नाव दिले आहे. असे सांगितले गेले होते.
दरम्यान, गुरुवारी इस्रायली सैन्याने हमास नौदलाचा कमांडर अमर अबू जलालासह अनेक हल्लेखोरांना ठार केले. संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी युद्धविराम करण्यापूर्वी सैनिकांची भेट घेतली. ते म्हणाले- जेव्हा पुन्हा युद्ध सुरू होईल, तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीने लढू. हे युद्ध अजून २ महिने चालणार आहे. हमासला पूर्णपणे नष्ट करणे हे आमचे ध्येय आहे. युद्धविराम दरम्यान, आम्ही हमासचे लपलेले ठिकाण शोधून स्वतःला तयार करू.