• Download App
    WATCH : कतारच्या अफगाण शरणार्थी शिबिराचे भीषण वास्तव, हजारो लोकांसाठी एकच टॉयलेट । afghan refugees in qatar camp new video viral taliban

    WATCH : कतारच्या अफगाण शरणार्थी शिबिराचे भीषण वास्तव, हजारो लोकांसाठी एकच टॉयलेट

    afghan refugees in qatar camp : अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तालिबानने संपूर्ण देश काबीज केला आहे. अशा परिस्थितीत जे पूर्वी अमेरिकेसह इतर देशांना पाठिंबा देत होते, त्यांना इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागतो. आता कतारमधून एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, यात निर्वासितांना एका छावणीत कसे राहायला भाग पाडले जात आहे हे दाखवले आहे. या निर्वासितांना मूलभूत सुविधाही मिळणेही दुरापास्त होऊन बसले आहे. आगीतून फुपाट्यात आल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. afghan refugees in qatar camp new video viral taliban


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तालिबानने संपूर्ण देश काबीज केला आहे. अशा परिस्थितीत जे पूर्वी अमेरिकेसह इतर देशांना पाठिंबा देत होते, त्यांना इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागतो. आता कतारमधून एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, यात निर्वासितांना एका छावणीत कसे राहायला भाग पाडले जात आहे हे दाखवले आहे. या निर्वासितांना मूलभूत सुविधाही मिळणेही दुरापास्त होऊन बसले आहे. आगीतून फुपाट्यात आल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे.

    अफगाणिस्तानची वृत्तसंस्था अस्वाकाने हा व्हिडिओ जारी केला आहे. यात हजारो लोक निर्वासित छावणीच्या आत बंदिस्त केलेले दिसत आहेत. या भागात सध्या कडक ऊन पडत आहे. तेथे ना एसी आहे, ना कुलर. निर्वासितांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे शौचालय. कारण हजार लोकांसाठी एकच शौचालय आहे. त्यांनी अनेक वेळा आपली अडचण मांडली, पण कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

    अनेक जण पळून जाण्याच्या बेतात

    तालिबानने काबूलवर कब्जा केल्यापासून लोक सातत्याने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विमानतळाच्या काटेरी कुंपणाजवळ अनेक महिला उभ्या आहेत. तिथल्या शिपायांना पाहताच त्यांनी आपल्या मुलांना तारेवरून फेकून दिले. त्यांना वाटले की जवानांनी त्यांच्या मुलांना तरी तिथून न्यावे, जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल.

    विमानाच्या चाकांवर लटकले होते

    काही दिवसांपूर्वी अमेरिकेने आपले नागरिक आणि अफगाण सहायकांना परत आणण्यासाठी C-17 विमान पाठवले होते. या विमानाला गर्दीने वेढले होते. विमान थांबले नाही, तेव्हा लोकांनी विमानाची चाके आणि पंख्याजवळ लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उड्डाणानंतर खाली पडल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा व्हिडिओ पाहून अवघ्या जगातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

    afghan refugees in qatar camp new video viral taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!