• Download App
    भारताला धक्का! चीनच्या सांगण्यावरून रशियाने पहिल्यांदाच पाकिस्तानला दिले कच्चे तेल|A shock to India! At the behest of China, Russia supplied crude oil to Pakistan for the first time

    भारताला धक्का! चीनच्या सांगण्यावरून रशियाने पहिल्यांदाच पाकिस्तानला दिले कच्चे तेल

    वृत्तसंस्था

    कराची : रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची पहिली खेप कराची बंदरात पोहोचली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानमध्ये सुरू असलेली महागाई आणि तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमध्ये ही दिलासादायक बातमी आहे.A shock to India! At the behest of China, Russia supplied crude oil to Pakistan for the first time

    पाकिस्तान प्रचंड कर्ज आणि चलनात सतत घसरण या समस्यांशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत रशियाकडून 45 हजार मेट्रिक टन कच्च्या तेलाची पहिली खेप स्वस्त दरात मिळणे हे वरदानापेक्षा कमी नाही. त्याचवेळी भारतासाठी हा मोठा धक्का आहे, कारण रशिया आणि भारताचे संबंध दृढ झाले आहेत. मात्र, चीनच्या इशार्‍यावर रशियाने आता पाकिस्तानलाही कच्च्या तेलाची खेप पाठवली असून, ते भारताच्या हिताला आव्हान देणारे आहे.



    पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

    पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रशियाकडून स्वस्त तेलाची पहिली खेप कराची येथे आल्यावर आनंद व्यक्त केला आणि ट्विट केले की, ‘मी देशाला दिलेले आणखी एक वचन पूर्ण केले आहे. कळविण्यात आनंद होत आहे की स्वस्त रशियन तेलाची पहिली खेप कराचीला पोहोचली असून उद्यापासून त्याचा पुरवठा सुरू होणार आहे. हा बदलाचा दिवस आहे. आम्ही समृद्धी, आर्थिक वाढ आणि ऊर्जा सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, ‘रशिया आणि पाकिस्तानमधील नवीन संबंधांची ही सुरुवात आहे’.

    जर सर्व काही सुरळीत झाले तर पाकिस्तान रशियाकडून दररोज एक लाख बॅरल तेल खरेदी करू शकेल. आजकाल पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 262 पाकिस्तानी रुपये आहे. रशियाकडून स्वस्तात तेल मिळाल्याने पाकिस्तानातील सर्वसामान्य ग्राहकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

    डिसेंबर 2022 पासून सुरू होत्या वाटाघाटी

    स्वस्त तेल खरेदीसाठी पाकिस्तान आणि रशियामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरपासून चर्चा सुरू होती. यापूर्वी रशियाने पाकिस्तानला 30 टक्के सवलतीत स्वस्त तेल देण्यास नकार दिला होता, परंतु नंतर जानेवारीमध्ये रशिया आणि पाकिस्तानने पुन्हा बोलणी केली आणि एप्रिलमध्ये पाकिस्तानने पहिला ऑर्डर दिला. गेल्या वर्षी पाकिस्तानने दररोज 1,54,000 बॅरल तेल खरेदी केले होते. यातील 80 टक्के खरेदी सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांकडून करण्यात आली आहे. आता पाकिस्तान रशियाकडून दररोज एक लाख बॅरल तेल खरेदी करू शकतो. त्याचबरोबर चीन आणि भारतानंतर पाकिस्तान हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून पुढे आला आहे.

    भारतासाठी धक्का

    रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील कच्च्या तेलाचा हा करार भारतासाठी धक्का आहे. खरे तर भारत आणि रशियाचे संबंध मजबूत आहेत, त्यामुळे रशियाने पाकिस्तानपासून दूर ठेवले होते, त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेच्याही जवळ होता. मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत-अमेरिकेतील संबंध दृढ होत असताना पाकिस्तान चीनच्या छावणीत गेला आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले असून ते एकटे पडले आहे. त्यामुळेच रशिया आणि पाकिस्तानही जवळ येत आहेत.

    A shock to India! At the behest of China, Russia supplied crude oil to Pakistan for the first time

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या