• Download App
    चीनमधील बड्या नेत्याने महिला टेनिस स्टारवर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केली जबरदस्ती|A big leader in China forced a female tennis star to have sex

    चीनमधील बड्या नेत्याने महिला टेनिस स्टारवर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केली जबरदस्ती

    विशेष प्रतिनिधी

    शांघाय : चीनची महिला टेनिस स्टार पेंग शुआई हिने तिच्याच देशातील एका बड्या नेत्याने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. पेंग शुआई ही माजी विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन दुहेरी विजेती आहे. टेनिस खेळण्यासाठी या नेत्याच्या घरी गेल्यावर त्याने आपल्यावर जबरदस्ती केल्याचे तिने म्हटले आहे.A big leader in China forced a female tennis star to have sex

    ३५ वर्षीय पेंगने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्त व्हाईस प्रीमियर झांग गाओली यांच्यावर बळजबरीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा जाहीरपणे आरोप केला आहे. मात्र, नंतर तिने ही पोस्ट डिलीट केली. मंगळवारी रात्री उशिरा तिच्या अधिकृत खात्याच्या स्क्रीनशॉटद्वारे याची पुष्टी झाली आहे. हा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.



    झांग यांनी २०१३ ते २०१८ दरम्यान चीनचे उप-प्रीमियर म्हणून काम केले आणि ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे जवळचे मित्र होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार झांग यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पोस्टमध्य पेंग म्हणाली, टेनिस खेळण्यासाठी त्या घरी गेल्यानंतर त्याने पहिल्यांदा तिच्यावर जबरदस्ती केली. त्या दुपारी तीने संमती दिली नाही आणि ती रडणे थांबवू शकले नाही.

    त्याने मला घरी नेऊन त्याच्याशी बळजबरीने संबंध ठेवायला भाग पाडले.आपण केलेल्या आरोपांचा पुरावा देऊ शकणार नाही, असे सांगून पेंग म्हणाली, माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. कोणताही पुरावा शोधणे अशक्य आहे. झांगला नेहमी भीती वाटत होती की मी टेप् रेकॉर्डरसारखे काहीतरी घेऊन येईल, पुरावे रेकॉर्ड करण्यासाठी किंवा काहीतरी. परंतु, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पण माझा विकृत पण अगदी खरा अनुभव आहे.

    A big leader in China forced a female tennis star to have sex

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप

    Trump White House : ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना सुरक्षेत त्रुटी, लॉकडाऊन लागू; अज्ञाताने सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला

    Ukraine : अमेरिकीशी मिनरल डील करणाऱ्या युलिया युक्रेनच्या पीएम होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पाठिंबा