मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून, झाडे उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांब पडले.
विशेष प्रतिनिधी
लाहोर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतात शनिवारी झालेल्या प्रचंडे पावसामुळे २८ जणांचा मृत्यू झाला असून १४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली, झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले. 28 dead over 140 injured due to heavy rains in Pakistans Khyber Pakhtunkhwa and Punjab provinces
अधिका-यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे खैबर पख्तुनख्वामधील बन्नू, लक्की मारवत, डेरा इस्माईल खान आणि करक जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाबमधील खुसाब जिल्ह्यातील एका गावात घराची भिंत कोसळून तीन मुलींचा मृत्यू झाला. मदत अधिकारी खतीर अहमद यांनी सांगितले की, जखमींना तत्काळ मदत दिली जात आहे.
गेल्या वर्षी देखील, पाकिस्तानमध्ये मान्सूनच्या पावसानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता आणि तब्बल शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता आणि तीन कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले होते. लाखो लोकांनाही विस्थापित व्हावे लागले होते.
28 dead over 140 injured due to heavy rains in Pakistans Khyber Pakhtunkhwa and Punjab provinces
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ‘आप’ची मेगा रॅली, रामलीला मैदानावर 1 लाख लोक हजर राहणार असल्याचा दावा
- अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना तिहेरी तलाक, राम मंदिरावर प्रश्न विचारत साधला निशाणा, म्हणाले…
- मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार
- द केरला स्टोरी नंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.