• Download App
    भारताचा आणखी 1 मोस्ट वाँटेड दहशतवादी पाकिस्तानात ठार, जैश कमांडर युनूस अतिरेक्यांना देत होता प्रशिक्षण|1 more most wanted terrorist of India killed in Pakistan, Jaish commander Yunus was training militants

    भारताचा आणखी 1 मोस्ट वाँटेड दहशतवादी पाकिस्तानात ठार, जैश कमांडर युनूस अतिरेक्यांना देत होता प्रशिक्षण

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी युनूस खान याची पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. जैश-ए-मोहंमदचा हा कमांडर तरुणांना फूस लावून दहशतवादी प्रशिक्षण द्यायचा.1 more most wanted terrorist of India killed in Pakistan, Jaish commander Yunus was training militants

    युनूस हा या महिन्यात अज्ञात हल्लेखोरांचा पाचवा बळी ठरला. १८ नोव्हेंबरला जैशचा दहशतवादी ताज मोहंमदही एका हल्ल्यात मारला गेला होता. १२ नोव्हेंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कराचीमध्ये जैश प्रमुख मौलाना मसूद अझहरचा जवळचा सहकारी मौलाना रहीमुल्ला तारिक याची गोळ्या झाडून हत्या केली होती. ९ नोव्हेंबर रोजी खैबर पख्तुनख्वा प्रांतात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अक्रम गाझी याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.



    गझवत-उल-हिंदचे जम्मू-काश्मिरात 4 हस्तक अटकेत

    दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवाद्यांच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. बारामुल्ला येथे जमीर अहमद, मोहंमद नसीम व मंजूर अहमद भट्टी लष्कर-ए-तोयबाचा हस्तक आहे. अन्य एक दहशतवादी साथीदारास सुरक्षा दलांनी शोपियांतून अटक केली. अन्सार गझवत-उल-हिंदचा हस्तक असल्याचे सांगण्यात येते.

    1 more most wanted terrorist of India killed in Pakistan, Jaish commander Yunus was training militants

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही