Thursday, 8 May 2025
  • Download App
    ३१ मार्च पर्यंत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर बंद – मुख्यमंत्री | The Focus India

    ३१ मार्च पर्यंत मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर बंद – मुख्यमंत्री

    विशेष  प्रतिनिधी

    मुंबई : “रेल्वे आणि बस शहराच्या वाहिन्या आहेत. ते बंद करणं सोपं आहे. पण त्या बंद झाल्यातर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होऊ शकतो. आरोग्य कर्मचाऱ्यांवरही, अन्य कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. तुर्त या दोन सेवा बंद होणार नाहीत,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. “सरकारी कार्यालयात २५ टक्के हजेरी असेल. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद उत्तम आहे. काही ठिकाणी ऑफिस सुरू आहेत. परंतु आता मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवणार आहोत. ही बंदी ३१ मार्च पर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.

    “सर्वजण जनतेशी बोलत आहेत. खबरदारीचा उपाय घेण्यास सांगितलं जात आहे घरी राहा. संपूर्ण जग जगण्यासाठी न थांबता धडपडत असतं. नाईलाजानं संपूर्ण जगाला आज घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेक संस्था, अनेकजण मदतीसाठी पुढे आले आहेत. सर्वजण आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. सर्वजण आपलं काम थांबवून मदतीला आले आहे. आपल्या चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी काही करण्याची भावना व्यक्त केली,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. “रोहित शेट्टींनीही एक फिल्म दिली. ती आम्ही रिलिझ केली आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व दिग्गज पुढे आले आहेत. काल मी सांगितलं तसा प्रतिसाद मिळतोय. विश्वासाच्या नात्यातून त्या शक्तीनं आपण संकटावर मात करू शकतो. गर्दीत फरक पडला आहे. १५ दिवस काळजी घेण्याची गरज आहे. नाईलाजानं सरकारला काही गोष्टी कराव्या लागतायत. आजपर्यंत जे सहकार्य मिळालं तसंच यापुढेही राहिल,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

    कर्मचाऱ्यांचं किमान वेतन बंद करू नका
    खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतल्याची माहिती मुख्मयंत्र्यांनी दिली. हातावर पोट चालणाऱ्यांना किमान वेतन द्यावं. कंपन्यांच्या मालकांनी माणुसकी जपावी, असंही आवाहन त्यांनी केलं. असं केल्यानं गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. ही फिरण्याची सुट्टी नाही. गर्दी कमी न झाल्याचं वाटल्यास नाईलाजानं रेल्वे बससेवा बंद करावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

    Related posts

    कोरोना तपासणीत ‘मेक इन इंडिया’ : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट

    कोरोना तपासणीत ‘मेक इन इंडिया’ : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट

    बॉम्बस्फोट करणारा फरार बांगला देशी मुंबईजवळ पकडला