विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेशाच्या कमलनाथ सरकारवर आज सुप्रिम कोर्टात आज निकाल अपेक्षित आहे. न्या. धनंजय चंद्रचुड, न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. यात दोन दिवस दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. राज्यपालांनी दोनदा पत्र पाठवूनही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेत बहुमत परीक्षण टाळले आहे. त्याविरुद्ध भाजपने कोर्टात धाव घेतली आहे. तर भाजपकडे गेलेल्या काँगेसच्या २२ आमदारांना आधी मुक्त करावे, अशी मागणी कमलनाथांच्या गोटातून कोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी आहे. निकालही आज अपेक्षित आहे. दरम्यान, काँग्रेस बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कर्नाटक हायकोर्टानेही त्यांना प्रतिबंध घातला. दिग्विजय सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर टीकास्र सोडले आहे.