विशेष प्रतिनिधी
मुंबई: हिंदी चित्रपट सृष्टीतील एक काळ मुमताजने गाजवला. सत्तरच्या दशकात तिचे एक वेगळेच स्थान होते, त्या काळातील सर्व सुपरस्टार सोबत तिने भुमिका केल्या आहेत. राजेश खन्ना बरोबर रुपेरी पडद्यावरील जोडी जमली असतांनाच तिचे चुलबुला हिरो शम्मी कपूर बरोबरचे प्रेमप्रकरण चर्चेत होते.
Why Mumtaj didn’t marry Shammi Kapoor?
हे नाते विवाह होण्यापर्यंत पोहोचलेही असते, पण मुमताजनेच नकार दिल्याने हा विवाह झाला नाही. मुमताज तिच्या शम्मी कपूर बरोबरच्या नात्यावर आता बोलली आहे. ती म्हणाली, ” त्याकाळात जगभरातील अनेक पुरुष माझ्याशी लग्न करु इच्छित होते. पण मी कुणाबरोबर सुखी राहू शकते याचा मला निर्णय घ्यायचा होता.” शम्मी कपूर माझ्याशी प्रेमाने वागत असे. कुणालाच ते माझ्या प्रेमात असतील असे वाटत नसे. हे पण कुणाला मान्य नाही की मी त्याना लग्नासाठी नाही म्हणाले असेन. शम्मी कपूर खूप श्रीमंत होते आणि प्रसिद्धपण होते त्यामुळे त्यांना मी नाही म्हणणार नाही असेच लोकांना वाटते. मी मयुर माधवांनीसाठी शम्मी कपूरला नकार दिला. पण हेही खरे आहे की त्यानी माझ्यावर खुप प्रेम केले.
नवोदित गायकांसाठी आनंदाची बातमी. मिळवा इंडियन आयडल मराठीमध्ये झळकण्याची संधी! त्यासाठी करा फक्त ‘हे’
पुर्वी एका मुलाखतीत मुमताज म्हणाली होती की, कपूर कुटुंबीयांमुळे मी शम्मी कपूरशी लग्न केले नव्हते. कारण कपूर घराण्यात लग्न झाल्यावर चित्रपटात काम करता येत नसे. ती करिअरच्या बाबतीत गंभीर होती. जीवनात तिला यश मिळवायचे होते. फिरोज खान बरोबर पण तिचे जवळचे नाते होते. पण फिरोज खानने तिला कधी लग्नासाठी विचारले नाही. चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर ब्रम्हचारी सारख्या सुपरहिट चित्रपटात तीने शम्मी कपूर बरोबर काम केले. राजेश खन्ना बरोबर तर तिची जोडी सुपरहिट होती. या जोडीने आपकी कसम, प्रेमकहानी, दो रास्ते, रोटी असे अनेक हिट चित्रपट दिले.
Why Mumtaj didn’t marry Shammi Kapoor?
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : रेल्वेने कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, 11.56 लाख कर्मचाऱ्यांना मिळतील 78 दिवसांचा बोनस जाहीर
- सुप्रीम कोर्टाने फटाके कंपन्यांना फटकारले, न्यायालय म्हणाले- ‘प्राणांचे मोल देऊन सण साजरा करण्याची परवानगी नाही!’
- वार – पलटवार : राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडूनही टीकास्त्र, पात्रा म्हणाले, ‘गांधी कुटुंबाकडून लखीमपूर खीरी शोकांतिकेचा वापर बुडणारे जहाज वाचवण्यासाठी!’
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, ७ मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यास मंजुरी, लाखो लोकांना रोजगारही मिळणार
- देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात पाचव्या दिवशी शिक्षा, नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांचा दंड