• Download App
    'स्पायडर मॅन : नो वे होम' या सिनेमाचा दुसरा ट्रेलर मंगळवारी झाला प्रदर्शित | The second trailer of the movie 'Spider-Man: No Way Home' was released on Tuesday

    ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ या सिनेमाचा दुसरा ट्रेलर मंगळवारी झाला प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी

    लॉस अँजेल्स : मार्वल सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ या सिनेमाचा दुसरा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. सोनी पिक्चर्स आणि मार्व्हल स्टुडिओ तर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ह्या सिनेमाचा एक थिएट्रिकल ट्रेलर एका महिन्यापूर्वी रिलीज करण्यात आला होता.

    The second trailer of the movie ‘Spider-Man: No Way Home’ was released on Tuesday

    2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या स्पायडरमॅन च्या ट्रेलर वरून असे कळते की, पीटर पार्कर(स्पायडर मॅन) जो ज्याची ओळख मागच्या भागामध्ये सर्व लोकांना कळाली आहे. ती ओळख लपवण्यासाठी तो ‘डॉक्टर स्ट्रेंज’ यांची मदत घेतो. पण डॉक्टर्स स्ट्रेंज यांनी केलेली मदत उलटते. त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्याची ओळख तर लपवली जाता नाही पण मल्टी युनिव्हर्स उघडले जाते. आणि त्यामुळे 2002, 2004, 2007, 2012 आणि 2014 साली प्रदर्शित झालेल्या सर्व स्पायडरमॅनच्या भागातील स्पायडरमॅनस सोबत येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण आधीच्या भागांमधील सर्व व्हिलन ट्रेलरमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या बाबतीत उत्सुकता निर्माण झाली आहे.


    कोण आहे स्क्विड गेम सीरिज मधील भारतीय अभिनेता अनुपम त्रिपाठी?


    पीटर पार्करची भूमिका निभावलेल्या टॉम हॉलंड यांनी ग्लोबल फॅन इव्हेंटमध्ये या बाबतीत आपल्या चाहत्यांना एक हिंट दिली आहे. सर्व स्पायडरमॅन या चित्रपटात दिसण्याची ‘शक्यता’ आहे असे त्यांनी विधान केले होते.

    The second trailer of the movie ‘Spider-Man: No Way Home’ was released on Tuesday

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी