विशेष प्रतिनिधी
मुंबई : तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, अभिज्ञा भावे आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींचा मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बॅन लिपस्टिक, आम्ही लिपस्टिकला सपोर्ट करत नाही अशा आशयाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ प्रमोशनल व्हिडिओ आहे की नेमके काय? यामुळे प्रेक्षकांमध्ये बराच मोठा संभ्रम तयार झाला होता. पण आता या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत.
Mystery behind Ban Lipstick is over! Tejaswini Pandit’s web series ‘Anuradha’ is being screened on Planet Marathi
संजय जाधव हे वेब सीरिजच्या विश्वात पदार्पण करणार आहेत. ‘अनुराधा’ या वेबसीरिजमधून ते वेबसीरिज विश्वात पदार्पण करत आहेत. तेजस्विनी पंडित या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. नुकतेच या सीरिजचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. बोल्ड हॉट रेड लिपस्टिक, हातात सिगरेट घेतलेली तेजस्विनी अतिशय बोल्ड आणि डॅशिंग अवतारात दिसत आहे. त्यामुळे एकंदर या सीरिजमध्ये अतिशय वेगळ्या विषयाला प्राधान्य दिलेले आहे हे दिसून आले येत आहे.
या सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित सोबत सोनाली खरे, स्नेहलता वसईकर, सुकन्या मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी हे कलाकार झळकणार आहेत. या सीरिजचे लेखक संजय जाधव आणि वैभव चिंचाळकर आहेत. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
Mystery behind Ban Lipstick is over! Tejaswini Pandit’s web series ‘Anuradha’ is being screened on Planet Marathi
महत्त्वाच्या बातम्या
- वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!!
- CDS Bipin Death : सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या अस्थींचे आज गंगेत विसर्जन, मुली घेऊन जाणार
- आपला तिरंगा नेहमीच उंच राहील, सीडीएस बिपिन रावत यांनी येथूनच घेतले प्रशिक्षण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे उत्तराखंडमध्ये संबोधन
- नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी