• Download App
    भारतात 2021 मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेल्या सिनेमांची यादी | List of most searched movies on Google in India in 2021

    भारतात २०२१ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेल्या सिनेमांची यादी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 2021 हे वर्ष संपत आले आहे. वर्षाच्या शेवटी अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत. अतरंगी रे, स्पायडर मॅन, पुष्पा, झिम्मा, पांडू असे अनके चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. त्यात कोरोना काळानंतर पहिल्यांदाच चित्रपट गृहात मुव्ही प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक देखील खुश आहेत. तर आता गुगलने 2021 मध्ये सर्वात जास्त सर्च केलेल्या सिनेमाची यादी जाहीर केली आहे.

    List of most searched movies on Google in India in 2021

    1. जय भीम : सुरीयाची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट गुगलवर सर्वात जास्त सर्च केला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट होता. आयएमडीबीवर आजवर सर्वात जास्त रेटिंग मिळालेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. समाजामध्ये असणारी विकृत असमानता आणि केला जाणारा भेदभाव यावर आधारित हा चित्रपट आहे.

    2. शेरशहा : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असणारा शेरशहा चित्रपटदेखील एका सत्य घटनेवर आधारित आहे. मेजर विक्रम बत्रा यांची ही एक रियाल लाइफ लव्ह स्टोरी होती.

    3. राधे : सलमान खान आणि दिशा पटानी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या राधे चित्रपट हा देखील गुगलच्या सर्च लिस्टमध्ये सर्वात जास्त सर्च केलेला चित्रपट आहे.

    4. बेलबॉटम : नुकताच अक्षय कुमारचा अतरंगी रे हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तर अक्षय कुमार यांचा बेलबॉटम हा चित्रपट देखील गुगलमध्ये सर्वात जास्त सर्च केला चित्रपट आहे.


    कभी खुशी कभी गम, चित्रपटाला २० वर्ष पूर्ण, जॉनी लिव्हर यांनी आपल्या मुलासोबत रीक्रिएट केला चित्रपटातील हिट सीन


    5. इटर्नल्स : मार्वल स्टूडियोजचा हा अॅडव्हेंचर अॅक्शन ड्रामा चित्रपट सुपरहिरोज आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स अँन्शियंट एलियन्सवर आधारित चित्रपट होता. ह्या चित्रपटाने देखील भारतात भरपूर कमाई केली होती.

    6. मास्टर : जोसेफ विजय याची प्रमुख भूमिका असणारा मास्टर हा सिनेमा एक उत्कृष्ट सिनेमा होता. याच सिनेमातील वाथी कमिंग हे गाणे प्रचंड फेमस झाले होते.

    7. सूर्यवंशी : अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता.

    8. गॉडझिला vs किंगकाँग : गॉडझिला आणि किंगकाँगना एकाच चित्रपटामध्ये एकत्र पाहण्याचा योग हा खूपच दुर्मिळ होता.

    9. दृश्यम 2 : मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या दृश्यम या चित्रपटाचा हिंदी मध्ये देखील रिमेक प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग आता मल्याळम मध्ये प्रदर्शित झाला होता.

    10. भुज : अजय देवगणचा भूज हा चित्रपट एक न सांगितलेल्या स्वातंत्र लढ्यातील गोष्टींवर आधारित सिनेमा होता. हा चित्रपट देखील गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च केल्यास सिनेमाच्या यादीत आहे.

    List of most searched movies on Google in India in 2021

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी