• Download App
    कल्की कोचलीनचे महिलांना झोप न मिळण्याच्या समस्येवर भाष्य- इन्स्टाग्रामवर शेअर केला नविन व्हिडिओ | Kalki Kochlin on women's ‘sleep deprivation’, Shares new video on Instagram about physical and mental health of women

    कल्की कोचलीनचे महिलांना झोप न मिळण्याच्या समस्येवर भाष्य- इन्स्टाग्रामवर शेअर केला नविन व्हिडिओ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: कल्की कोचलिन ही नेहमीच आरोग्य चांगले राखण्यावर भर देत असते आणि आरोग्याबद्द्लच्या बऱ्याच गोष्टींवर भाष्य करताना दिसते. नुकताच तिला एक गोड मुलगी झाली आहे. ती इन्स्टाग्रामवर महिलांसाठी आरोग्य विषयक बरेच सल्ले देत असते. गर्भ धारणा, गर्भ काळ, प्रसूती अश्या अनेक बाबींवर तिने आपले मत आणी उपयोगी सल्ले वारंवार आपल्या instagram अकौंटवरून शेअर करत असते. एरवी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर ती मुलगी सॅफो बरोबरचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येते.

    Kalki Kochlin on women’s ‘sleep deprivation’, Shares new video on Instagram about physical and mental health of women

    बुधवारी महिलांना झोप मिळत नसल्याने होणाऱ्या समस्येवर भाष्य करणारा व्हिडिओ तिने अपलोड केला आहे. ‘झोपेबाबत थोडेसे’ असे म्हणत तिने सांगितले आहे की, बाळाच्या आईने मिळेल तशी डुलकी व झोप घेणे महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रसूती नंतर स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल होतात. शारीरिक आणि मानसिक पातळीवर स्त्री नव्या रूपाने जन्म घेत असते. तेव्हा स्त्रियांनी स्वत: ची काळजी घेणे आणि ह्या काळजीचा भाग म्हणून व्यवस्थित झोप घेणे गरजेचे आहे, असा संदेश कल्कीला ह्या व्हीडीओ मधून आपल्या चाहत्यांना द्यायचा होता.


    वेड्या मुलांची आईसाठी वेडी माया, आपल्याकडे ठेऊन घेण्यासाठी चढले कोर्टाची पायरी


    या व्हिडिओमध्ये तिच्या मुलीबरोबर डुलकी काढल्याचे फोटो आहेत. मुलीच्या जन्मानंतरच्या पहील्या तीन महिन्यांतील हा काळ आहे. छोट्याशा सॅफोबरोबर तिही झोप काढताना दिसली आहे. कल्कीने यातून झोपेचे महत्व दर्शविले आहे.

    ‘झोप पूर्ण न होणे ही काही साधी बाब नाही. यामुळे मानसिक व शारीरिक थकवा येतो. नवमातांना हा झोप न मिळण्याचा अनुभव येतोच ‘ असे ती म्हणते. यात ती पुढे म्हणते की, “घरातील इतरांनी कामे वाटून घेतली पाहिजेत. बाळाच्या काही जबाबदाऱ्या स्वत:कडे घेऊन बाळाच्या आईला झोपण्यासाठी वेळ दिला पाहिजे.”

    Kalki Kochlin on women’s ‘sleep deprivation’, Shares new video on Instagram about physical and mental health of women

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी